Christmas Celebration : लंडनमधील मराठी बांधवांनी पॅडिंग्टन रेल्वे स्टेशनवर साजरा केला ख्रिसमस | पुढारी

Christmas Celebration : लंडनमधील मराठी बांधवांनी पॅडिंग्टन रेल्वे स्टेशनवर साजरा केला ख्रिसमस

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ख्रिसमस म्हणजे आनंद, आणि नव्या वर्षासाठी प्रचंड ऊर्जा आणि उत्साह घेऊन येणारा सण. केवळ ख्रिस्ती बांधवच नव्हे तर सर्वधर्मीय या सणाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. या सणानिमित्त लंडनमधील चित्र तर प्रचंड आकर्षक आहे.

लंडनमधील पॅडिंग्टन या ऐतिहासिक रेल्वे स्टेशनवर इंग्लंडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून स्थायिक असलेल्या मराठी ख्रिश्चन मंडळींनी ख्रिसमस कॅरल्सचे आयोजन केलंय. गेल्या चार वर्षांपासून प्रशांत आणि माधुरी कुलकर्णी यांच्याकडून या उपक्रमाचं आयोजन केलं जातं.

इंग्लंडच्या विविध भागातून जवळपास १०० ते १५० लोक या कॅरल्समध्ये सहभागी होतात. लंडनशिवाय मँचेस्टर, बर्मिंगहॅम, ब्रिस्टल, स्विंडन या शहरांमधून हे सर्व जण एकत्र येतात. महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेली आणि अनेक वर्षांपासून इंग्लंडमध्ये स्थायिक झालेली ही मंडळी मोठ्या आनंदात हा सण साजरा करतात आणि हा सण, नव्या वर्षाचा आनंद भरभरून जगतात.

हेही वाचा : 

Back to top button