Best Christmas Destinations : ख्रिसमस साजरा करा ‘या’ ८ सुंदर ठिकाणी

christmas in auli
christmas in auli
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ख्रिसमस फीवर सुरू झाला आहे. आपण यावेळी भारतातील अशा शहरात जाऊ, जिथे डबल आनंद मिळेल. मग ती कोणती ठिकाणे आहेत, ठाऊक आहे का? ख्रिसमस काळात फिरण्यासाठी ही परफेक्ट Best Christmas Destinations आहेत. या ठिकाणी तुम्हाला नक्की जायला हवं.  २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस आहे आणि तुमचा व्हेकेशन सेलिब्रेशन मूड असेल तर भारतातील अशी काही शहरे आहेत, जिथे तुम्ही फिरायला जाऊ शकता आणि ख्रिसमस साजरा करू शकता. जवळपास भारतातील सर्वच शहरांमध्ये ख्रिसमसचं सेलिब्रेशन असतं. परंतु, भारतातील काही अशी काही शहरे आहेत, जिथे लोक खास ख्रिसमस साजरा करण्यासाठी जातात. हा ख्रिसमस तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरु शकतो. (Best Christmas Destinations)

गोवा

गोव्यात ख्रिसमसचं सेलिब्रेशन मोठ्या प्रमाणात असतं. तसेच न्यू इअर सेलिब्रेशनसाठी संपूर्ण भारतात गोवा प्रसिद्ध आहे. येथील बीच पार्टीज खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये डान्स, सी फूड, विद्युत रोषणाई याचा आनंद घेणं एक वेगळीचं मजा आहे. ख्रिसमस काळात घरांमध्ये पारंपरिक मिठाई बनवली जाते. अनेक बेकरी, दुकानांमध्ये चविष्ट आणि सुंदर मिठाई येथे चाखायला मिळते. चर्चबाहेर म्युझिक आणि सुंदर ख्रिसमस ट्री तुम्हाला दुसऱ्या विश्वात घेऊन जातात. १६ व्या शतकातील सर्वात मोठे चर्च Sé Cathedral पाहण्यासारखे आहे. ख्रिसमस काळात तुम्ही चर्चबाहेर डान्सचा आनंद घेऊ शकता. तुम्ही खाण्याचे शौकीन असाल तर टर्की वा चिकनने बनलेल्या अनेक टेस्टी डिशेसची चव चाखू शकता.

bandra
bandra

मुंबई

ख्रिसमससाठी आणि न्यू ईअरसाठी येथे देश-विदेशातून लोक पोहोचतात. त्यात जुहू चौपाटी म्हटलं तर क्या बात है! जुहू चौपाटीवर रात्री उशीरापर्यंत म्युझिक प्रोग्रॅम आणि पार्टीचं वातावरण राहतं. सेंट मायकल चर्च, मरीन ड्राईव्ह, सेंटा क्लॉजकडून मिळणारी भेट, समुद्राच्या लहरींवर ख्रिसमसचं सेलिब्रेशन अफलातून असतं. गेटवे ऑफ इंडिया, बोरीवली, कोलाबा, बांद्रा वरळी सी लिंक अशा ठिकाणीदेखील पर्यटक सेलिब्रेशनसाठी पोहोचतात.

मसूरी

सेलिब्रेशन आणि हिल स्टेशन मसूरी (Hill Station Mussoorie) चं नाव नाही, असं होऊचं शकत नाही. क्वीन्स ऑफ हिल नावाने प्रसिद्ध मसूरीदेखील Christmas Celebration साठी नहमीचं तयार असतं. डेहराडून जिल्ह्यात वसलेलं मसूरीदेखील एक खूप सुंदर डेस्टिनेशन आहे, हे एक परफेक्ट प्लेस आहे. ख्रिसमस सेलिब्रेशनला आला तर भट्टा फाल, गनहिल, कंपनी गार्डन, माल रोड, क्लाउड अँड, जॉर्ज एव्हरेस्ट, कॅम्पटीला नक्की भेट द्या.

कोलकाता

कोलकातामध्ये ब्रिटिश शासन काळापासून येथे ख्रिसमस मोठ्या धामधुमीत साजरा करण्याचा ट्रेंड आहे. जो अद्यापही जारी आहे. येथे डान्स, गाणी आणि चविष्ट पदार्थांसोबत दंगा मस्ती सुरु असते. पार्क स्ट्रीटचा नजारा तर खूप सुंदर असतो. सेंट पॉल कॅथेड्रल चर्चमध्ये जी गर्दी असते, ती परफेक्ट ख्रिसमसचं फील देते. येथे अनेक जुन्या बेकरीज आहेत. अनेक जुन्या चर्चसमोर ख्रिसमस ईव्हिनिंग तुम्ही एन्जॉय करु शकता.

शिमला

बर्फ आणि हिल स्टेशनच्या ठिकाणी तुम्ही जर ख्रिसमस साजरा करायचा विचार करत असाल तर शिमला हे परफेक्ट डेस्टिनेशन आहे. या सीझनमध्ये शिमलामध्ये खूप पर्यटक येतात. जर ही ट्रिप आणखी रोमँटिक करू इच्छिता तर कालका ते शिमलापर्यंत टॉय ट्रेनमध्ये प्रवास करा. येथे उत्तम रेस्टॉरंट्स आहेत, जेथे तुम्हाला खूप चवदार जेवण मिळू शकते. जर तुम्ही इतिहास प्रेमी असाल तर तमच्यासाठी बोनस पॉईंट हा आहे की, येथे ब्रिटिश काळातील ऐतिहासिक इमारती Viceregal Lodge, Rothney Castle, Gaiety Theatre, Woodville Palace आहेत. तसेच १९ व्या शतकातील क्राईस्ट चर्च देखील आहे. कुफरी, नारकंडा, मशोबरा, नालदेहरा या पर्यटन स्थळी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये नाईट पार्टी आणि डान्सचं आयोजन केलं जातं. काही ठिकाणी कश्मीरी फूड फेस्टिव्हलदेखील भरवलं जातं. त्याचबरोबर पर्यटन नगरी मनालीमध्ये ख्रिसमस दिनी अनेक लोक पोहोचतात. कुल्लू आणि मनाली हेदेखील ख्रिसमससाठी लव्हेबल ठिकाणे आहेत.

हर्षिल (Harisil)

उत्तराखंड येतील हर्षिल हे एक पर्यटन स्थळ आहे. हर्षिल व्हाईट ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी (White Christmas Celebration) ओळखलं जातं. येथील निसर्ग बर्फाच्छादित असतो. सुंदर निसर्गाची रचना असलेल्या हर्षिलमध्ये ख्रिसमसचं सेलिब्रेशन परफेक्ट आहे.

कोची

कोचीमध्ये अनेक जुने चर्च आहेत. येथे ख्रिश्चन बांधवांची संख्याही अधिक आहे, जर तुम्ही ख्रिसमस सीझनमध्ये येथे गेला तर फरची झाडे, सजलेली घरे, दुकाने, सँटा आणि जीजसच्या मूर्ती तुम्हाला जागोजागी दिसतील. रात्री उशारी तुम्ही सेंट फ्रँसिस चर्च जाऊन अविसम्रणीय प्रसंग बनवू शकता. येथे भारतातील सर्वात जुने युरोपियन चर्च आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येथे स्थानिक सण असतात. कोचीन कार्निव्हलमध्ये म्युझिकल फायर वर्क, सजवलेले हत्ती, गेम्स, स्पोर्ट्स सारख्या अनेक मजेशीर ॲक्टिविटीज असतात. चर्च रोडवर पायी चालण्याचा आनंदच वेगळा आहे. अरबी समुद्रावरून येणारी थंड हवा, जुने चर्च, सी फूड, नारळ पाणी (शहाळे) आणि पुर्तगाली, डच स्थापत्यशैली जुन्या इमारती या गोष्टी तुम्हाला एन्जॉय करता येतात.

औली

उत्तराखंडमधील औली हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथील ख्रिसमस सेलिब्रेशन सुंदर क्षणांनी स्मरणीय ठरेल. चारी बाजूंनी बर्फाची चादर औलीचे सौंदर्य वाढवणारे आहे.

(फोटो – संग्रहित)

हेदेखील वाचा- 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news