BSc Nursing : राज्यात बीएससी नर्सिंगचे प्रवेश बारावीच्या गुणांआधारेच होणार;औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला कायम | पुढारी

BSc Nursing : राज्यात बीएससी नर्सिंगचे प्रवेश बारावीच्या गुणांआधारेच होणार;औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला कायम

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; राज्यातील बीएससी नर्सिंगचे प्रवेश बारावीच्या गुणांआधारेच होणार आहेत. प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सीईटी सेलला १५ फेब्रुवारीपर्यंतचा अवधीही दिला आहे. बीएससी नर्सिंग प्रवेशासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करणाऱ्या राज्य सीईटी सेलला चांगलीच चपराक बसली आहे. नर्सिंग (BSc Nursing ) प्रवेशासाठी औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.

BSc Nursing : प्रवेश बारावीच्या गुणांआधारेच 

इंडियन नर्सिंग कौन्सिलने यंदाच्या बीएससी नर्सिंगच्या प्रवेशासाठी नीट यूजी परीक्षेमध्ये ५० टक्के पसेंटाईल मिळविण्याची अट ठेवली होती. या अटीविरोधात रितू गायकवाड, प्रतिक्षा पाटील या विद्यार्थिनी तसेच प्रायव्हेट नर्सिंग स्कूल अॅड कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशन आणि असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट अनएडेड नर्सिंग कॉलजने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. नीट यूजीमध्ये ५० पर्सेटाईलपेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाही बारावीच्या गुणाआधारे या प्रवेशप्रक्रियेत भाग घेता यावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. यावर औरंगाबाद खंडपीठाने ही याचिका निकाली काढत नर्सिंग अभ्यासक्रमाचे प्रवेश नीट यूजी ऐवजी बारावीच्या गुणांआधारे घेण्याचे आदेश दिले होते.

या विरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करणाऱ्या राज्य सीईटी सेलने दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने जैसे थे ठेवत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ दिली आहे.या विरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करणाऱ्या राज्य सीईटी सेलने दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने जैसे थे ठेवत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ दिली आहे.नर्सिंग प्रवेशाच्या पहिल्या फेरीनंतर न्यायालयाचा निर्णय आला होता. पहिल्या फेरीत १ हजार २०० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. न्यायालयाच्या या निर्णयानंतर विद्यार्थ्यांना फेब्रुवारीपर्यंत प्रवेश पूर्ण करावे लागणार आहेत.

हेही वाचा 

Back to top button