Raosaheb Danve : "सिलोड जिल्हा झाला नाही तर, अब्दुल सत्तारांना मतदान करू नका" - पुढारी

Raosaheb Danve : "सिलोड जिल्हा झाला नाही तर, अब्दुल सत्तारांना मतदान करू नका"

औरंगाबाद, पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबद येथील कार्यक्रमात भाजप नेत्यांचा उल्लेख भावी सहकारी असा केला, त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क मांडले जात आहेत. अशात व्यासपीठावर उपस्थित असणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना मुख्यमंत्र्यांच्या विधानावर विचारले असता त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

रावसाहेब दानवे म्हणाले की, “सोलापूरपासून धुळ्यापर्यंत रेल्वे झाली नाहीतर रावसाहेब दानवे यांना मतदान करून नका असं अब्दुल सत्तार यांनी पाठीमागे जनतेला सांगितलं होतं. मग मी पण आता म्हणतो, सिलोड जिल्हा झाला नाही, तर अब्दुल सत्तार यांना मतदान करू नका, बघू मग लोक कुणाचं ऐकतात”, अशी फटकेबाजी रावसाहेब दानवे यांनी केली.

रावसाहेब दानवे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना काॅंग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केलेल्या अनुभवावरून असं विधान केलं असावं. इतकंच नाही, काॅंग्रेसचे नेते खूप त्रास देतात. आपण एकदा बसून ूबोलू, असंही मुख्यमंत्री कानात म्हणाले”, असाही दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानानंतर आगामी काळात शिवसेना आणि भाजपची युती झाली, तर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे चालतील का, या प्रश्नाला उत्तर देताना दानवे म्हणाले की, “आधी सगळं जमून येऊ देत. मग, पुढे चर्चा होत राहतील. शिवसेना आणि भाजप पूर्वमित्र होते. त्यामुळे आता पुन्हा मित्र होण्याची शक्यता आहे”, असंही रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी सांगितलं.

“शिवसेना हा आमचा समविचारी पक्ष आहे, त्यामुळे शिवसेनेनं युतीचा विचार केला तर निश्चितच भाजप त्याचं स्वागत करेल”, असं सूचक विधान भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.

पहा व्हिडीओ : अभिनेत्री प्रार्थना बेहरे बनवतेय गणपती स्पेशल गाजराची खीर

Back to top button