Ramdev Baba apologises : 'त्या' वादग्रस्त विधानाबाबत रामदेव बाबांनी मागितली माफी | पुढारी

Ramdev Baba apologises : 'त्या' वादग्रस्त विधानाबाबत रामदेव बाबांनी मागितली माफी

पुढारी ऑनलाईन डेस्क : ठाणे येथे झालेल्या कार्यक्रमात केलेल्‍या वादग्रस्‍त विधानावर योगगुरु बाबा रामदेव यांनी खेद व्यक्त करत माफी (Ramdev Baba apologises ) मागितली आहे. याबाबतची माहिती  महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत दिली आहे.

काय म्हणाले होते रामदेव बाबा ?

पतंजली योगपीठाच्या वतीने ठाण्यात  महिलांसाठी योग विज्ञान शिबिर शुक्रवार (दि.२५)  आयोजित केले होते. शिबिरासाठी सुटसुटीत ड्रेसमध्ये आलेल्या बर्‍याच महिलांना विशेष कार्यशाळेसाठी योगासाठी साडी परिधान करणे वेळेअभावी जमले नाही. यावर रामदेव बाबा  म्हणाले होते की, “महिलांना साडी परिधान करता आली नाही, काही हरकत नाही. घरी जाऊन त्या साडी नेसू शकतात. तसेही महिला साडी आणि ड्रेसमध्ये तर सुंदर दिसतात. त्यांनी काही घातले नाही, तरी त्या सुंदरच दिसतात.” त्यांच्या या वादग्रस्‍त विधानाचे संतप्त पडसाद उमटले. विविध राजकीय पक्ष व महिला संघटनांनी रामदेव बाबा यांच्यावर टीका केली.

Ramdev Baba apologises : विधानावरुन संतापाची लाट

रामदेव बाबांच्या विधानावरुन सर्व स्तरातून संतापाची लाट उमटली. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने रामदेव बाबा यांना पत्र लिहून  ७२ तासात त्यांनी केलेल्या विधानाचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. रामदेव बाबांच्या या विधानावर संजय राऊत, किशोर तिवारी, महेश तपासे, अपर्णा मलिकर, आदी लोकांनी त्यांच्याकडून माफीची मागितली होती. ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिकात्मक फोटोला काळे फासले होते.महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने रामदेव बाबा यांना पत्र लिहून  ७२ तासात त्यांनी केलेल्या विधानाचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. त्यानंतर रामदेव बाबा यांनी खेद व्यक्त करत वादग्रस्‍त विधानावर माफी मागितली आहे. या संदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांना या आशयाचा इमेलही पाठवला आहे.

उत्तरात रामदेव बाबा म्हणाले…

 माफीनाम्‍यात रामदेव बाबांनी म्हटलं आहे की, राज्य महिला आयोग अधिनियम 1993 नुसार आपण कोणताही गुन्हा केलेला नाही. नेहमी जागतिक स्तरावर महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले आहेत. कारण महिलांना समाजात समानतेचा दर्जा मिळावा. आत्तापर्यंत भारत सरकारच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’सारख्या योजनांना प्रोत्साहन मिळावा म्हणून विविध संघटनांसोबत काम केलं आहे. ठाणे येथील कार्यक्रम हामहिलांसाठी होता. इथे केलेले विधानातून कोणत्याही महिलेचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. कार्यक्रमातील माझ्‍या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला गेला. माझ्या विधानाचा गैरअर्थ काढण्यात आला आहे.  मी महिलांच्या कपड्यांबद्दल केलेल्या विधानाचं अर्थ  साध्या कपड्यात असा होता. मी माझ्‍या संपूर्ण भाषणात मातृशक्तीचा गौरव केला आहे.  माझ्या या विधानावरुन कोणाच्या  भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करत आहे. ज्यांच मन दुखावलं आहे त्या सर्वांचा मी मनापासून माफी मागतो.
फोटो – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या ट्विटर अकाउंटवरुन

हेही वाचा 

Back to top button