ॲड आशिष शेलार, "महाराष्ट्र एटीएस झोपलय का?" | पुढारी

ॲड आशिष शेलार, "महाराष्ट्र एटीएस झोपलय का?"

मुंबई, पुढारी ऑनलाईन : नवरात्र, रामलीला अशा हिंदू सणांमध्ये घातपात करणाच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. यात महाराष्ट्रातून जान मोहम्मद शेखला धारावीतून स्पेशल सेलने अटक केली. मुंबईत आणि राज्यात अशी कट कारस्थान सुरु असताना महाराष्ट्र राज्याच दहशातवाद विरोधी पथक (एटीएस) झोपलय का? असा सवाल भाजप नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी केला आहे. पोलिसांवर असलेल्या राजकीय दबावामुळे त्यांच अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होतय असाही आरोप ही त्यांनी यावेळी केला.

आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना ॲड. शेलार म्हणाले, “नॅान कॅाग्निजेबल ॲाफेन्समधे केंद्रीय मंत्र्यांना अटक करणारे राज्याचे पोलीस, पत्रकारांना हात नाही पाय लावू अशी भाषा करणारे पोलीस, विद्यमान आमदाराला लुक आउट नोटीस काढण्याचा प्रताप करणारे पोलीस दहशतवाद्यांच्या बाबतीत का झोपले होते हे गृहमंत्री स्पष्ट करतील का? या दहशतवादी प्रकरणाची इंटेलिजन्स माहिती पोलिसांना, गृहमंत्र्यांनी होती तर मग एका विशिष्ट वर्गाबाबत मवाळ भूमिका अस राजकीय प्रकरण नाही ना? असा सवाल करत पोलिसांच्या इंटेलिजन्स फेल्युअरवर गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

“आता सरकार बैठका घेतल असलं तरी झालेल्या अक्षम्य दुर्लक्षावर आता पांघरुण घालता येणार नाही. राजकर्ते पोलिसांच लक्ष नको, त्या विषयात घालतात मग अशा घटना घडतात. आमचे पोलीस सक्षम आहेत. पण, राजकीय दबाव, सरकारची गटबाजी, वसुलेबाजी, आणि सौदेबाजी यामुळे ही स्थिती आली. चौकशी अजून वाढवावी आणि गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी”, असे आवाहन ॲड आशिष शेलार यांनी केल आहे.

Back to top button