धक्कादायक! पुण्यात सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार | पुढारी

धक्कादायक! पुण्यात सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे; पुढारी वृत्तसेवा : १४ वर्षाच्या मुलीवरील सामूहिक बलात्काराची संतापजनक घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पुणे स्टेशन परिसरात एका सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडल्याचे समजते आहे.

एका रिक्षा चालकाने फुटपाथवर झोपलेल्या सहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी काही तासातच आरोपीला ताब्यात घेतले आहे.

सहा वर्षाची मुलगी तिच्या कुटूंबियासह पुणे स्टेशन परिसरात फुटपाथवर झोपली होती. झोपेत असतानाच आरोपी रिक्षा चालकाने तिला उचलून पुणे-सातारा रोड परिसरात नेले आणि तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समजते आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनूसार, पुणे स्टेशन पिरसरात पीडित मुलीचे कुटुंब राहते. पहाटे पीडित मुलगी आईच्या कुशित झोपली असताना, आरोपी रिक्षाचालकाने तिला उचलून रिक्षात ठेवले. यानंतर रिक्षा थेट मार्केटयार्ड येथील एका पडीक इमारतीजवळ नेली.

त्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर चुमुकलीला नेऊन लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, घरच्यांना जाग आल्यावर मुलगी नसल्याचे दिसले. त्यांनी सुरवातीला आजूबाजूला शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. त्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलिस स्टेशन गाठले.

पोलिसांनीही नुकत्याच घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसर पिंजून काढला तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढत त्याला मार्केटयार्ड परिसरात जेरबंद केले. यानंतर पीडित मुलीला रुग्णालयात उपाचारासाठी दाखल केले.

तक्रार मिळताच होताच, पोलिसांची पथके मुलीच्या शोधासाठी रवाना झाली. तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढून त्याला अटक करण्यात आली. आरोपीचे आडनाव मांढरे असे आहे.

यशवंत गवारी (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बंडगार्डन)

क्राईम : ‘त्या’ प्रेम प्रकरणात शिवतेजचा खून कसा झाला?

Back to top button