शिवसेना फोडण्याची तयारी अडीच वर्षांपासून सुरू होती?, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने खळबळ | पुढारी

शिवसेना फोडण्याची तयारी अडीच वर्षांपासून सुरू होती?, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने खळबळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : दोन अडीच वर्षांपासून आमचे सरकार येणारच हे सांगणारा मी काही वेडा नव्हतो तर त्यासाठी योजना आखली जात होती असे वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ४० आमदार फोडणे सोपी गोष्ट नव्हती त्यासाठी मोठे प्रयत्न करण्यासाठी आम्ही वेळ घेतला. असाही खुलासा त्यांनी यावेळी केला. पुण्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर पुणे भाजपकडून आयोजित सत्कार प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणले, मला पुण्यात पाठवताना पक्षाने मोठा विचार केला होता, पण यासाठी अनेकांनी माझ्यावर टीकेचे शिंतोडे उडवले होते. त्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला मला देण्यात आला होता.

दरम्यान, या वेळी बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी राजू शेट्टी यांच्या वक्त्यव्यांचा समाचार घेतला. या निवडणुकीवेळी शेट्टी यांनी अनेकदा मोदींना शिवीगाळ केली होती, हे मी कधीच सहन करू शकत नाही. एकवेळ आई-वडिलांना शिव्या द्या चालेल, पण मोदी-शहांना दिलेल्या शिव्या मी कधीच सहन करू शकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

 

हे वाचलंत का?

 

Back to top button