पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात आज आणि उद्या असे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोल्हापूर, मुंबईस, ठाणे नवी मुंबई, पालघर या परिसरात विजांच्या कडकडाटासह काल पाऊस झाला. (Rain Update) तर पुणे, नागपूर कोकणातील सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस झाला.
आज सकाळी अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. आजपासून पावसाचा जोर वाढणार असून दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने (India Meteorological Department) वर्तवली आहे. राज्यात कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढचे पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजपासून (8 सप्टेंबर) पावसाचा जोर कायम राहणार. पालघर, ठाणे, धुळे, जळगाव, नंदूरबार वगळता इतर सर्व जिल्ह्यात यलो अलर्ट (Yellow Alert) सांगण्यात आला आहे. यलो अलर्ट दिलेल्या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. गेल्या काही दिवसात पावसाने हजेरी लावली आहे. काल (७ सप्टेंबर) राज्यातील बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे. आजपासून तीन ते चार दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
दरम्यान, पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
oFairly widespread/widespread rainfall with isolated heavy falls and thunderstorm/lightning very likely over Lakshadweep & Tamil Nadu Puducherry & Karaikal on 07th; Rayalaseema during 07th-09th; Coastal Andhra Pradesh & Yanam and South Interior Karnataka during 07th-10th;