राज्‍यसभा निवडणूक : प्रत्येक घटक पक्ष हा मविआसोबतच : खा. संजय राऊत

file photo
file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क :  राज्‍यसभा निवडणुकीत प्रत्येक घटक पक्ष हा महाविकास आघाडीसोबतच आहे.  हितेंद्र ठाकूर यांची बाअिवा सुध्दा आमच्यासोबत आहे. काही मित्र पक्ष नाराज आहेत त्‍यांच्‍याशी नाराजी दूर करण्‍याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.

औरंगाबाद येथे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आज (८ जून रोजी)  मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या शिवसेना संभाजीनगर शाखेच्या ३७ व्या वर्धापन दिनी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा. सायंकाळी ६ वाजता  होणार आहे. या सभेचा आढावा घेण्‍यासाठी आले असता संजय राऊत यांनी माध्‍यमांशी संवाद साधला. ते म्‍हणाले, प्रत्येक घटक पक्ष हा माविआसोबत आहे.  हितेंद्र ठाकूर यांची बाअिवा सुध्दा आमच्यासोबत आहे. मित्र पक्षांची नाराजी दूर करण्‍याचा प्रयत्‍न  केला जाईल.

मुख्‍यमंत्री ठाकरे यांच्‍या सभेच्‍या पार्श्वभूमीवर औरंगाबादध्ये बॅनरबाजी सुरु आहे.   विराेधी पक्षातील तोंड म्हणजे गटार, अशी टीकाही त्‍यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवर केली.

औरंगाबाद येथे होणाऱ्या जाहीर सभेला मुख्यमंत्री शिवसेना खासदार संजय राऊत, पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्हे उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news