बारावीचा निकाल जुनच्या दुसऱ्या आठवड्यात :वर्षा गायकवाड | पुढारी

बारावीचा निकाल जुनच्या दुसऱ्या आठवड्यात :वर्षा गायकवाड

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता असलेल्या बारावीचा निकाल येत्या पंधरा दिवसात जाहीर केला जाईल, अशी ग्वाही राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल पंधरा दिवसांच्या आत लागेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. शिर्डी येथे आयोजित केलेल्या काँग्रेसच्या एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

दहावी आणि बारावीच्या निकालासंदर्भात अनेक पालक आणि विद्यार्थ्यांकडून विचारणा झाली विचारणा होत असते या धर्तीवर पुढील आठवड्यात १२ वीचा निकालाची शक्यता वर्तवून या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाईल असे त्या म्हणाल्या.

जिल्हा वार्षिक योजनेतून पाच टक्के निधी शालेय शिक्षणासाठी : वर्षा गायकवाड

कोरोना नंतर म्हणजे दोन वर्षांनी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या ऑफलाइन परीक्षा परीक्षा पार पडल्या आहेत. त्यामुळे हा निकाल विद्यार्थ्यांसाठी विशेष असणार आहे. दहावी आणि बारावीच्या पेपर तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याबाबत संबंधित बोर्डांना सूचना दिल्या आहेत, असेही प्रा. गायकवाड म्हणाल्या.

हेही नक्की वाचा….

वर्षा गायकवाड : पेपर फुटल्यास संबंधित शाळांची मान्यता रद्द!

बदलत्या काळाप्रमाणे शिक्षकांनीही स्वतःला बदलावे : वर्षा गायकवाड

सोलापूर : डिसले गुरुजींना रजा का दिली? शिक्षणमंत्री गायकवाड यांच्याविरुद्ध कोर्टात जाण्याची जि. प. सदस्याची तयारी

Back to top button