शिक्षक बँकेच्या निवणुकीचा बिगुल वाजला; 13 पासून उमेदवारी अर्ज सुरू | पुढारी

शिक्षक बँकेच्या निवणुकीचा बिगुल वाजला; 13 पासून उमेदवारी अर्ज सुरू

नगर : पुढारी वृत्तसेवा

अनेक दिवसांपासून लक्ष लागलेल्या अहमदनगर जिल्हा शिक्षक बँकेच्या निवडणुकीचा बिगुल अखेर आज वाजला. बँकेसाठी 13 जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून, 17 जुलै रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

गडचिरोली : ७५ वर्षीय वृद्धेचा उष्माघाताने मृत्यू

शिक्षक बँकेत सध्या गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे यांची सत्ता आहे. आता आगामी निवडणुकीसाठी सर्वच शिक्षक संघटना तयारीला लागल्या आहेत. बँकेच्या 21 जागांसाठी ही निवडणूक होऊ घातली आहे.

मोबाईलवर ‘हॉरर’ व्हिडिओ पाहिला; नंतर बाहुलीला फाशी देऊन चिमुरड्याने घेतला गळफास, पिंपरीतील धक्कादायक घटना

13 ते 17 जून दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील, 20 जून रोजी छाननी, 21 ते 5 जुलै रोजी माघार, 6 जुलै रोजी चिन्ह वाटप, 17 जुलै रोजी सकाळी 8 ते 4 या वेळेत मतदान आणि दुसऱ्या दिवशी 18 जुले रोजी सकाळी 9 वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी हे काम पाहणार आहेत.

हेही वाचा

WhatsApp चे नवीन फीचर येतेय, sent झालेला मेसेज एडिट करता येणार!

कर्ज बुडवल्याप्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीचे समन्स

Back to top button