पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील बोगद्याला ‘स्पीडब्रेकर’ | पुढारी

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील बोगद्याला ‘स्पीडब्रेकर’

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे ते मुंबई प्रवासात 25 ते 30 मिनिटांची बचत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी)हाती घेतलेल्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला विलंब होणार आहे. हा प्रवास वेगवान होण्यासाठी खोपोली ते कुसगाव असा 19.80 किमीचा बोगदा बांधण्यात येत आहे. जून 2023 मध्ये हा बोगदा वापरात आणण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र प्रशासकीय उदासिनता आणि कोरोना महामारीच्या संकटामुळे रस्त्याच्या कामाला ‘स्पीडबे्रकर’ लागला आहे.

राज्‍यसभा निवडणुकीत भाजपला करायचा आहे घोडेबाजार : संजय राऊत

पहिल्या टप्प्यातील 12.43 किमीच्या रस्त्याचे 43.2 टक्के तर दुसर्या टप्प्यातील 7.41 किमीच्या रस्त्याचे 28.49 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एमएसआरडीसीने दिली. प्रकल्पाचे 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. काम पूर्ण होण्यास मार्च 2024 उजाडणार आहे. या बोगद्यामुळे प्रामुख्याने खोपोली ते कुसगाव दरम्यानचा मार्ग आता सहाऐवजी आठ पदरी होणार आहे. याच प्रकल्पांतर्गत दोन बोगदेही बांधण्यात येत आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबई ते पुणे प्रवासाचे अंतर 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार आहे.

कुलगाममध्‍ये काश्मिरी पंडित शिक्षिकेवर दहशतवाद्‍यांचा गोळीबार

मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गामुळे मुंबई-पुणे अंतर कमी झाले असून प्रवास वेगवान झाला. मात्र द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ मुंबई ते पुणे द्रुतगती मार्ग (6 मार्गिका) आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 (4 मार्गिका) एकत्र येतात आणि खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. फेब्रुवारी 2019 मध्ये दोन टप्प्यांत या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात झाली. यासाठी 6695.37 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

हनुमान जन्मस्थळ वाद : नाशिकरोडला आज धर्मसंसद, काय निघणार तोडगा ?

या रस्त्याने प्रवास करणे खूप कठीण जाते. शासनाने लवकरात लवकर सुरु असलेल्या प्रकल्पाचे काम पूर्ण केल्यास हा प्रवास सुखकर होणार आहे.

                                                                  – दत्तराज शिंदे, (प्रवासी)

कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशात असलेल्या रस्त्यांवर अंवलबून असतो. परदेशात चांगल्या प्रकारचे रस्ते पहायला मिळतात. त्यामुळे त्या ठिकाणी विकासाची गंगा वाहत असते.

 – महेश कुंठे, (उद्योजक)

Back to top button