पेट्रोल, डिझेल दरवाढीने मशागतीचा खर्च वाढणार | पुढारी

पेट्रोल, डिझेल दरवाढीने मशागतीचा खर्च वाढणार

उंडवडी : पुढारी वृत्तसेवा

गेल्या दोन वर्षांपासून शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने तो कर्जाच्या खाईत लोटला गेला. यंदा वेळेवर पाऊस होईल या आशेने शेतकरी जोमाने मशागतीची कामे करत आहेत. परंतु पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरामुळे मशागतीच्या खर्चातही दुपटीने वाढ झाल्याने शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत.

उंडवडी सुपे (ता. बारामती) परिसरात मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामे जोमात सुरू आहेत. यावर्षी पाऊस वेळेवर दाखल होण्याचे संकेत हवामान खात्याने दिल्याने जिल्ह्यातील सर्वच भागात खरीपपूर्व शेतीकामांना वेग आला आहे. रखरखत्या उन्हातही शेतकर्‍यांनी शेती मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे.

Qutub Minar : पुरातत्त्व खाते करणार कुतुबमिनार परिसरात खोदकाम, ‘विष्णूस्तंभ’ असे नामकरण करण्याची झाली होती मागणी

यात बैलजोडीऐवजी ट्रॅक्टरने मशागत मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचे चित्र बारामती तालुक्यात पाहायला मिळत आहे.
गेल्या वर्षी पाऊस वेळेवर न झाल्याने खरीप हंगामातील बहुतांश पेरण्या रखडल्या, तर काही पेरण्या उशिरा झाल्याने शेतातील पिकांचे नुकसान झाले.

यावर्षीच्या खरिपात तरी निसर्ग साथ देईल आणि शेतीतून काहीतरी उत्पन्न हाती येईल या आशेने शेतकरी मशागतीत मग्न आहे. पूर्वी बैलजोडीद्वारे अनेक शेतकरी आपल्या शेतात मशागत करीत. मात्र सध्या बैलजोडीचे प्रमाण कमी होत चालले असून बैलजोडी मिळणेही कठीण झाल्याने ट्रॅक्टरने मशागत करण्यावर शेतकरी भर देत आहेत.

आसाममध्ये पुराचा हाहाकार; १८ जणांचा मृत्यू

यापेक्षा ट्रॅक्टर सहज उपलब्ध होतो. शिवाय वेळेची बचत होते आणि शेतीची नांगरणी खोलवर होते. यामुळे शेतकर्‍यांचा ट्रॅक्टरद्वारे मशागतीकडे कल वाढला आहे.  उंडवडी सुपे परिसरात मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामे चालू आहेत.

वैफलग्रस्त मनसेला उपचाराची गरज : संजय राऊत 

Back to top button