टोमॅटोनेही दाखवला महागाईचा रेड फ्लॅग, इतका आहे किलोमागे दर

पुणे : पुढारी वृत्तसेवा
राज्यासह परराज्यातून मोठी मागणी असल्याने टोमॅटोला सध्या प्रतिकिलोला 50 ते 80 रुपये भाव मिळत आहे. एप्रिल महिन्यापर्यंत सातत्याने मिळणार्या कमी दरामुळे बहुतांश शेतकर्यांनी टोमॅटोची पिके काढून टाकली. त्यात ज्यांनी पिके राखली, त्याला अतिउष्णतेचा फटका बसल्याने टोमॅटोच्या उत्पादनात घट झाली आहे.
Rakhi Sawant : ६ वर्षांनी लहान आहे राखीचा नवा बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानी
परिणामी, शहरातील बाजारपेठांमध्ये होणार्या आवकेत निम्म्याहून अधिक घट झाली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात पुण्यासह, सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर परिसरातून टोमॅटो दाखल होतात. एरवी बाजारात दररोज सरासरी दहा ते बारा हजार क्रेटमधून टोमॅटो येतात.
VVS Laxman : व्हीव्हीएस लक्ष्मण होणार टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक
महिनाभरापूर्वी मार्केट यार्डात 7 ते 8 हजार क्रेटमधून टोमॅटो बाजारात दाखल होत होते. आवक कमी असली, तरी परराज्यातून मागणी होत नव्हती. परिणामी घाऊक बाजारात टोमॅटोच्या दहा किलोला 100 ते 180 रुपये भाव मिळत होता, तर किरकोळ बाजारात 20 ते 30 रुपये किलो दराने विक्री सुरू होती.
राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाची हत्या केली : देवेंद्र फडणवीस
सद्यस्थितीत बाजारातील आवक अवघी 4 हजार क्रेटवर आली आहे. त्या तुलनेत मागणीही अधिक आहे. कर्नाटक, तसेच गुजरातमधील बाजारपेठांमध्ये टोमॅटोला अधिक दर मिळत असल्याने बहुतांश शेतकरी परराज्यात टोमॅटो विक्रीसाठी पाठवत आहेत. परिणामी शहरातील बाजारपेठेत टोमॅटोचे दर वधारले आहेत.
मार्केट यार्डात दहा किलोचे दर 400 ते 450 रुपयांवर गेले आहे. किरकोळ बाजारातही टोमॅटोचे भाव कडाडले असून ते 50 ते 80 रुपयांवर पोहोचले आहेत.
टोमॅटोचे पीक येण्यास दोन ते अडीच महिने लागतात. ज्या ठिकाणी पाण्याच्या तुटवड्यामुळे उत्पादनात घट झाली आहे तेथे पाणी उपलब्ध झाल्यास टोमॅटोच्या उत्पादनात वाढ होऊन आवक वाढेल. मे अखेरपर्यंत टोमॅटोचे वाढलेले दर कायम राहतील.
– विलास भुजबळ, व्यापारी