बिबटसह वाघ, सिंहांच्या गर्जनेने दणाणणार पुणे जिल्हा | पुढारी

बिबटसह वाघ, सिंहांच्या गर्जनेने दणाणणार पुणे जिल्हा

बारामती/ओतूर : पुढारी वृत्तसेवा

पुणे जिल्हा आता बिबट्यांसह वाघ-सिंहांच्या गर्जनेने दणाणणार आहे. बारामती तालुक्यातील गाडीखेल येथे वाघ, सिंह; तर जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे बिबट सफारी प्रकल्प करण्याचे आता निश्चित झाले असून, प्राथमिक कामांनी वेग घेतला आहे.

sedition law : राजद्रोहाचं कलम १२४ अ तूर्तास स्थगित, सुप्रीम कोर्टाचा आदेश

या दोन्ही प्रकल्पांची जागानिश्चिती झाली आहे. आता मोजणी, प्रकल्प अहवाल, प्रकल्प सल्लागार नियुक्ती, अशी कामे सुरू झाली असून, येत्या एक-दोन वर्षांत दोन्ही प्रकल्प आकाराला येतील, अशी शक्यता आहे. या दोन्ही प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे.

Asani cyclone : असनी चक्रीवादळ पोहोचले आंध्र प्रदेशमध्ये; समुद्र किनाऱ्यावर मुसळधार पाऊस

जुन्नर तालुका यापूर्वीच पर्यटन तालुका म्हणून जाहीर झालेला आहे, तर बारामती तालुक्यात या प्रकल्पाबरोबरच शिवसृष्टीचा प्रकल्प आकाराला येत असल्याने बारामती आणि परिसरातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. बारामतीत मयूरेश्वर अभयारण्य आहे तसेच लगतच्या इंदापूर तालुक्यात निसर्गरम्य उजनी उजनी बॅक वॉटर परिसर असल्याने या भागातील पर्यटन विकासाला बहर येणार आहे.

थरार! धाडसानं आई काठी घेऊन धावली अन् बिबट्याच्या जबड्यातून चिमुकलीची केली सुटका

जुन्नरचा बिबट सफारी प्रकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीला नेला, असा आरोप करीत मध्यंतरी राजकारणही फार झाले. जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी तर उपोषणही केले. परंतु, आता वाघ-सिंह प्रकल्प बारामतीला आणि बिबट सफारी प्रकल्प जुन्नरला नक्की झाल्याने राजकीय वाद निवळून प्रकल्प मार्गी लागले.

Back to top button