परळी, पुढारी ऑनलाईन डेस्क : मातोश्रीबाहेर शनिवारी हनुमान चालीसाचे पठन करणारच असे आव्हान राणा दाम्पत्याने दिले हाेते. या वेळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर पहारा दिला होता. यावेळी ८० वर्षांच्या आजींनी "हम झुकेगा नही" म्हणत उन्हात सेनेच्या कार्यकत्यांसह पहारा दिला हाेता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या कुटुंबासह चंद्रभागा शिंदे यांची निवासस्थानी परळी येथे सदिच्छा भेट दिली.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, व्यक्ति हा वयाने नाही तर मनाने तरुण असतो. आजी युवासेनेच्या कार्यकर्त्या आहेत. आजीसारखे शिवसैनिक माझ्या पाठीशी आहेत. त्यामूळे भाग्य मोठे आहे. मी सर्वांचे आभार मानताे. यावेळी चंद्रभागा शिंदे म्हणाल्या, माझे भाग्य मोठे आहे. मुख्यमंत्री साहेब स्वत: माझ्या घरी आले. माझे शिवसेनेतील कार्य सफल झाले.
हेही वाचा