सी-डॅकने उघडले आता ‘त्रिनेत्र’; नव्या कार्डमुळे मायक्रोचीप, प्रोसेसर आणि कार्ड आयातीची गरज नाही | पुढारी

सी-डॅकने उघडले आता ‘त्रिनेत्र’; नव्या कार्डमुळे मायक्रोचीप, प्रोसेसर आणि कार्ड आयातीची गरज नाही

पुणे : पुढारी वृत्तसेवा

सुपर कॉम्प्युटर अर्थात महासंगणकासाठी महत्त्वाचे ठरणारे मायक्रोचीप, प्रोसेसर आणि कार्ड हे सुटे भाग आजवर आपल्याला चीन, जपान, तैवान, अमेरिका या देशांकडून विकत घ्यावे लागत असत. आता मात्र पुण्यातील सी-डॅकने (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स कॉम्प्युटींग) हे सर्व भाग देशी बनावटीत तयार करून दाखवत मेक इन इंडियाच्या दिशेने जगात मोठे पाऊल टाकले आहे.
सी-डॅकने विकसित केलेल्या ‘त्रिनेत्र’ या महासंगणकासाठी लागणार्‍या कार्डला जगात 62 वे नामांकन मिळाले आहे. अवघ्या अडीच वर्षांतच सध्याच्या महासंगणकापेक्षा हजारपट वेगाने चालणारे भारतीय बनावटीचे सुपर कॉम्प्युटर पुण्यातून तयार होईल, असा विश्वास सी-डॅकच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

Petrol Diesel Prices : १० दिवसांत नवव्यांदा इंधन दरात वाढ, मुंबईत डिझेलचे शतक

पुणे शहरातील पाषाण रोडवर सी-डॅक नवी इमारत झाली आहे. 2 एप्रिल रोजी संस्था 38 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने सी-डॅकचे महासंचालक कर्नल ए. के. नाथ यांनी शास्त्रज्ञांनी केलेल्या शेकडो प्रकारच्या संशोधनाची माहिती दिली. परम महासंगणक ते सध्याचे महासंगणक असा प्रवासच त्यांनी सांगितला. महासंगणकाव्दारे सर्वच क्षेत्रांत कसे प्रभावी आणि वेगवान काम करता येते हेच त्यांनी सांगितले. अनेक उत्पादने देशासाठी कशी विकसित केली त्याची माहिती त्यांनी दिली.

रशिया- युक्रेन युद्ध : कुटनितीमुळे भारताचा वाढला जगात दबदबा; अनेक देशांचे परराष्ट्रमंत्री भारत दौर्‍यावर

अचूक अंदाज घेणार्‍या ‘त्रिनेत्र’चा जगात डंका

महासंगणकासाठी लागणारे ‘त्रिनेत्र’ नावाचे कार्ड येथील शास्त्रज्ञ डॉ. अतुल बोडसच्या टीमने तयार केले आहे. त्याला जगात 62 वे नामांकन मिळाले. त्रिनेत्र हे चौथ्या जनरेशनचे नेटवर्क आहे. यात अनेक हार्डवेअर व सॉफ्टवेअरचे घटक एकत्र आहेत. याची अतिशय उच्च प्रकारची बॅन्डविड्थ आहे. याचा उपयोग हवामानाचा अचूक अंदाज, आण्विक मॉडेलिंगसह उद्योगात अनेक ठिकाणी होऊ शकतो. ही प्रणाली वायरमुक्त, बटनमुक्त असून रिमोटवर आहे. जगात अतिशय अद्ययावत दर्जाचे असे हे नेटवर्क मानले जाते; तसेच ट्रेटावाची नेटवर्क सिस्टीम तयार केली आहे. ती भारतीय हवाईदल, नौदलाला उपयोगी आहे. रेडिओ लहरींऐवजी याचा उपयोग करता येईल; तसेच रेल्वे, विमानसेवा सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनातही त्याचा उपयोग होणार आहे.

केंद्रीय धाडी हा केवळ गंमतीचा विषय : संजय राऊत

मोबाईलवर एम-कवच अ‍ॅप डाऊनलोड

वाढते सायबर गुन्हे आणि हॅकरची चोरी हा मोठा धोका ओळखून त्यावर एम-कवच नावाचे अ‍ॅप तयार केले असून, ते मोफत आहे. हे मोबाईलवर डाऊनलोड केले, तर तुमचा सर्व डेटा सुरक्षित राहणार आहे. हे अ‍ॅप 2 एप्रिलपासून सर्वांना वापरायला मिळणार आहे. यात डेटाची गोपनीयता, चुकीचे फसवे मेसेज, पासवर्ड बाहेर जाणे यावर ते लक्ष ठेवते, तसेच तुमचा ओटीपी बाहेर जाऊ देत नाही. सायबर मार्गदशिकादेखील या शास्त्रज्ञांनी तयार केली असून, त्याच्या पुस्तिकेचे बुधवारी प्रकाशन करण्यात आले. यावेळी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेद्र जोशी, डॉ. हेमंत दरबारी यांचीही उपस्थिती होती.

Back to top button