मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राजेश टोपे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून निर्बंधामध्ये शिथिलता देण्याबाबत आग्रही मागणी सुरु आहे.
आरोग्य विभागाकडून तसेच टास्क फोर्सने तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे देण्यात आल्यानंतर चर्चेला आणखी जोर आला आहे. याच अनुषंगाने आज चर्चा झाल्यानंतर आरोग्यमंत्री टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली.
राज्यातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंधामध्ये शिथिलता आणणार असल्याचे सुतोवाच टोपे यांनी केले आहेत. अर्थात, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणवरील टांगती तलवार कायम असणार असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
२५ जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्हीटी रेट राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे त्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय झाला आहे. निर्णयाची फाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे जाईल. त्यांनी सही केल्यानंतर एक दोन दिवसात शिथिलता देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.
कोकणसह, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, बीड, पालघर, नगर हे जिल्हे तिसऱ्या टप्प्यामध्येच राहणार आहेत. या जिल्ह्यांसह ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध राहतील.
ज्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होतील त्या ठिकाणी वीकेंड लॉकडाऊन ऐवजी शनिवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने फक्त रविवारी बंद राहतील. खासगी कार्यालयांमध्ये सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण असल्यास ५० टक्के कर्मचारी क्षमतेसह कार्यालये सुरू करण्यास परवानगी आदी मुद्यांचा समावेश आहे. शॉप, रेस्टॉरंट, सिनेमा हॉल यांना सशर्त परवानगी दिली जाऊ शकते.
पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या जिल्ह्यात निर्बंध शिथिलता
२५ जिल्ह्यांमध्ये शिथिलता
११ जिल्हे तिसऱ्या लेव्हलमध्येच राहणार
दुकाने, रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत सकारात्मक चर्चा
दोन ते तीन दिवसात रेल्वेचा निर्णय
हे ही वाचलं का?