सोलापूर : विशाल फटे विरोधात आणखी 7 तक्रारी दाखल; आकडा 24.55 कोटींवर | पुढारी

सोलापूर : विशाल फटे विरोधात आणखी 7 तक्रारी दाखल; आकडा 24.55 कोटींवर

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

विशाल फटे याच्याविरुद्ध बार्शी तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडे फसवणूकप्रकरणी तक्रारींचा पाऊस सुरू आहे. शुक्रवारीदेखील 7 तक्रारदारांनी फटेविरोधात तक्रारी दिल्या आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्या व्यक्‍तींची संख्या ही 126 झाली आहे. फसवणुकीची रक्‍कम ही 24 कोटी 55 लाख 56 हजार 520 रुपये झाली आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावे फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल फटे याच्या नातेवाईकांची 18 बँक खाती शुक्रवारी (दि. 28) ग्रामीणपोलिसांनी गोठवली. या खात्यांमधून पोलिसांनी 73 लाख महिन्याला 25-30 टक्के व्याजाचे आमिष दाखवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावे फसविणार्‍या ठकसेन विशाल फटे याने बार्शीतून सुरुवात केली आणि महाराष्ट्र कर्नाटकात जाळे पसरविले. पुढे दहा लाखांत वर्षाला 6 कोटी रुपयांच्या परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधींच्या गुंतवणुकीचा कारभार फटेने केला.

त्यातून तीन वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून त्याने कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली होती. तो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गाशा गुंडाळून गायब झाला होता. दरम्यान तो गायब झाल्याने शेकडो गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले होते. त्याच्याविरोधात तक्रारींचा
पाऊस सुरू झाला. यातून बार्शी पोलिसांनी फटेसह त्याच्या कुटुंबातील पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याचे वडील अंबादास फटे व भाऊ वैभव फटे याला अटक केली होती. विशाल फटे हा 17 जानेवारीला पोलिस मुख्यालयात हजर झाला होता.

या गुन्ह्याचा तपास एका विशेष पथकामार्फत सुरु असून विशाल फटे यास न्यायालयाने 1 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांच्या तपासामध्ये मुख्य आरोपी विशाल फटे व त्याचा भाऊ वैभव फटे या दोघांच्या विविध नातेवाईकांची विविध बँक खात्यामध्ये 18 खाती पोलिसांना मिळून आली. ही सर्व बँक खाती पोलिसांनी गोठवली आहे. फटेच्या नातेवाईकांच्या बँक खात्यातून पोलिसांनी 73 लाख रुपयांची रक्‍कम जप्त केली आहे. तसेच पोलिसांनी फटे याची आलिशान चारचाकी गाडीदेखील जप्त केली आहे. पोलिस तपासामध्ये विशाल फटे याची बार्शी येथील भगवंत पतसंस्थेत दोन लॉकर असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही लॉकर शुक्रवारी पोलिसांकडून उघडण्यात येणार होती.

परंतु, काही तांत्रिक अडचणीमुळे ती उघडण्यात आली नाहीत. शनिवारी ही दोन्ही लॉकर उघडण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी उपअधिक्षक संजयकुमार बोठे यांनी दिली. नाकातून द्यावयाच्या बूस्टर डोसच्या चाचणीस परवानगी  दिली होती. तिसर्‍या डोसच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीला मंजुरी मिळालेली भारत बायोटेक ही देशातील दुसरी कंपनी आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन स्ट्रेनचा मुकाबला करण्यासाठी बूस्टर डोस प्रभावी ठरणार असल्याचे भारत बायोटेककडून सांगण्यात आले आहे. बूस्टर डोस म्हणून कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड तसेच स्पुत्निक- व्ही या लसींना आतापर्यंत परवानगी देण्यात आलेली आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button