

माळीनगर, पुढारी वृत्तसेवा
अकलूज-टेंभुर्णी रस्त्यावर माळीनगर नजीक ट्रॅक्टर व होंडा सिटी कारचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले व ते रस्त्याच्या बाजूला जाऊन पडले. या अपघातात दोन चालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
रविवारी पहाटे दोन वाजता माळीनगरपासून एक किलोमीटर अंतरावर पद्मावती पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला. रस्त्याच्या रुंदीकरणाचे दोन्ही बाजूने काम चालू असल्यामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. तसेच या रस्त्यावरून ऊस वाहतूकही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परिणामी वाहतुकीची कोंडी होत आहे.
कान्हापुरीचा ट्रॅक्टर ऊस खाली करून परत जात असताना खंडाळी येथील होंडा होंडा सिटी कार (एमएच 13 बीएम 2741) व ट्रॅक्टर या दोन्ही वाहनांचे समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले. यात होंडा सिटी कारचे ही मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिस स्टेशन मध्ये झाली नसल्याने जखमींची नावे समजू शकली नाहीत.
हेही वाचा