Maharashtra Politics : ‘जनतेला’ पोपट बनवलं जात आहे, रोहित पवारांची ‘पोपट’ प्रकरणात उडी; जाणून घ्या ‘पोपट’ प्रकरण
पुढारी ऑनलाईन डेस्क : "कोणाचा पोपट मेला हे निश्चितपणे सांगता येणार नाही. परंतु महाराष्ट्राच्या विकासाचा, युवकांच्या भविष्याचा, सर्वसामान्यांच्या स्वप्नांचा, आशा-आकांक्षांचा पोपट मेला हे मात्र निश्चितपणे खरं आहे." असं ट्विट करत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही 'पोपट' प्रकरणात उडी घेतली. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ठाकरे गट, भाजप नेत्यांच्या प्रतिक्रियांमध्ये 'पोपट' शब्द वारंवार येऊ लागला आहे. कोणाचा कसा 'पोपट' झाला यावर सातत्याने एकमेकांवर टिका होत आहे. यामध्ये आता रोहित पवार यांनीही उडी घेतली आहे. जाणून घ्या नेमके हे पोपट प्रकरण काय आहे. (Maharashtra Politics)
Maharashtra Politics : कोणाचा पोपट मेला?
गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात 'पोपट' हे प्रकरण खूप चर्चेत आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत या प्रकरणात उडी मारली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "राजकीय वक्तव्ये करताना दोन्ही बाजूंनी पोपट मेल्याची वक्तव्ये करण्यात येत आहेत. कोणाचा पोपट मेला हे निश्चितपणे सांगता येणार नाही. परंतु महाराष्ट्राच्या विकासाचा, युवकांच्या भविष्याचा, सर्वसामान्यांच्या स्वप्नांचा, आशा-आकांक्षांचा पोपट मेला हे मात्र निश्चितपणे खरं आहे. कुणावर टीका करायची नाही पण सध्याची राजकीय परिस्थिती बघता जनतेला पोपट बनवलं जात असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये दृढ होत आहे, हे मात्र नक्की!"
'पोपट मेला आहे' जाहीर करण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांची : उद्धव ठाकरे
गेले काही दिवस चर्चेत असणारा आणि महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिलेला सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला. या निर्णयावर बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की,"पोपट हलत नाही, निश्चल आहे. त्याने डोळे मिटलेले आहेत. चोच उघडत नाही. श्वासही घेत नाहीये. हे वर्णन करून पोपट मेलेला आहे हे जाहीर करण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवलं आहे.
'मविआ'चा पोपट मेला आहे : देवेंद्र फडणवीस
Maharashtra Politics : राऊत-राणे 'पोपट' प्रतिक्रिया
- Sanjay Raut : लोकसभा जागा वाटपाबाबत संजय राऊतांचे मोठे विधान; म्हणाले मविआचा फॉर्म्यूला…
- शेतकऱ्यांना मोठा दिलासा! खतांच्या किंमतीत कोणतीही वाढ होणार नाही; मंत्रिमंडळाचा निर्णय
- Pakistan News Updates : अल्टिमेटम संपला…इम्रान खान यांच्या निवासस्थानावर कोणत्याही क्षणी सुरक्षा दलांचा छापा, दहशतवादी लपल्याचा संशय

