Maharashtra Politics : राऊतांच्या ‘जुगार’वरील आराेपाला भाजपचे ‘व्हिस्की’ने प्रत्युत्तर
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील राजकीय नेत्यांमधील आरोप आणि प्रत्यारोपांचे सत्र कायम आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे. तर भाजपनेही राऊतांना जोरदार प्रत्यूत्तर दिले. (Maharashtra Politics)
Maharashtra Politics : झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय!
संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आपल्या 'X' खात्यावर सलग तीन पोस्टसह बावनकुळेंचे फोटो शेअर करत जुगाराचे गंभीर आरोप केले. त्यांनी आपल्या पहिल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "महाराष्ट्र पेटलेला आहे. आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. फोटो zoom करुन पहा.ते तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है…" तर पुढील पोस्ट करत त्यांनी म्हटलं आहे की,"19 नोव्हेंबर मध्यरात्री, मुक्काम पोस्ट: मकाऊ, veneshine. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले, असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?" तिसरी पोस्ट करत म्हटलं आहे की,"ते म्हणे फॅमिलसह मकाऊला गेले आहेत. जाऊ द्या. त्यांची सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे. कधीच जुगार खेळले नाहीत. मग ते नक्की काय करीत आहेत? झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय!"
ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय… भाजपचे सडेताेड प्रत्युत्तर
संजय राऊतांच्या आरोपानंतर भाजप गटातील लोकांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. महाराष्ट्र भाजपाने आपल्या 'X' खात्यावर आदित्य ठाकरेंचा फाेटाे पोस्ट करत म्हटलं आहे की,""आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ आदित्यच्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हिस्की?
प्रवीण दरेकर यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो जाणीवपूर्वक कोणीतरी काढला आहे अस म्हणतं पोस्ट केली आहे की,"भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होते. तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राउंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आहे आणि त्याच्याच शेजारी हा कसिनो आहे. या परिसरात बावनकुळेजी कुटुंबासह होते. त्यावेळी कुणीतरी काढलेला हा फोटो आहे. केवळ बदनामी करण्याच्या हेतूने हा फोटो घेतलेला आहे. त्यांच्या शेजारी त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील बसले होते. मात्र जाणीवपूर्वक फक्त एकट्या बावनकुळे साहेबांचा फोटो टाकला.
हेही वाचा :

