

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
एकनाथ शिंदे यांच्या बंडाने महाविकास आघाडीचे सरकार अस्थिरतेच्या मार्गावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आज ( दि. २१) मंत्रालयांमध्ये बैठक घेण्यात गुंग आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि अजित पवार यांच्या मनात चालले काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार सकाळी दहा लाच मंत्रालयात पोहचले. त्यानंतर त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांसोबत विभागाच्या बैठका घेतल्या. त्यांनी आपला ठरलेला कार्यक्रम बदलला नाही. आपल्या विभागाच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनाच नाही तर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेबरोबरच काँग्रेसची मते फुटल्याने शिंदे यांच्या बंडाची झळ पोचू नये म्हणून काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे. आपल्या आमदारांना काँग्रेसने मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली असताना अजित पवार निर्धास्त असल्याचे दिसले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि अजित पवार यांच्या मनात चालले काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा :