

पुढारी ऑनलाईन : वृद्ध साहित्यिक व कलाकारांना सरसकट ५ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय आज शनिवारी (दि.१६) राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जनतेच्या हिताचे आज निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठीच्या कल्याणकारी मंडळासाठी ५० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. तसेच राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्याबाबतही राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. (Cabinet Decisions)
राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
हे ही वाचा :