Loneliness in America : ‘एकाकीपणा’ दररोज १५ सिगारेट ओढण्याइतकाच गंभीर

Loneliness in America : ‘एकाकीपणा’ दररोज १५ सिगारेट ओढण्याइतकाच गंभीर
Published on
Updated on
पुढारी ऑनलाईन डेस्क : यूएस सर्जन जनरलने एकाकीपणा ही एक सार्वजनिक आरोग्य महामारी असल्याचे मंगळवारी (दि.) म्हंटले आहे. त्यांनी पुढे असं म्हंटल आहे की, दररोज १५ सिगारेट पिणे आरोग्याला धोके निर्माण करु शकते. त्यामुळे आरोग्य उद्योगाला वार्षिक अब्जावधी डॉलर्सचा खर्च येतो. सुमारे अर्ध्या यूएस प्रौढांनी सांगितले की त्यांनी एकाकीपणाचा अनुभव घेतला आहे, संशोधन स्पष्ट झाले आहे की, एकाकीपणामुळे एखाद्या व्यक्तीला नैराश्य, चिंता आणि स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता वाढते आणि अकाली मृत्यूचा धोका सुमारे 30% वाढतो. (Loneliness in America )

Loneliness in America : लोक एकाकीपणाशी संघर्ष करत आहेत

यूएस सर्जन जनरल डॉ. विवेक मूर्ती यांनी त्यांच्या ८१ पानांच्या अहवालात म्हटले आहे की, सुमारे अर्ध्या यूएस प्रौढांचे म्हणणे आहे की त्यांनी एकाकीपणाचा अनुभव घेतला आहे.  एकटेपणा ही एक सामान्य भावना आहे. ही भावना  बरेच लोक अनुभवतात. एकाकीपणा भूक किंवा तहान सारखा आहे. अमेरिकेतील लाखो लोक एकाकीपणाशी संघर्ष करत आहेत आणि ते योग्य नाही. म्हणूनच मी लाखो लोक अनुभवत असलेल्या संघर्ष कमी करण्यासाठी आरोग्य महामारी घोषित करण्याचा सल्ला दिला आहे. डॉ. विवेक मूर्ती यांनी पुढे असही म्हंटल आहे की, आरोग्य महामारी घोषणेचा उद्देश हा  एकाकीपणाबद्दल जागरुकता वाढवण्याचा आहे.

एकटेपणाची भावना दिवसेंदिवस  वाढत आहे

एका संशोधनात असे दिसून आले आहे की अमेरिकन, अलिकडच्या दशकात पूजा घर, समुदाय संस्था आणि अगदी त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांशी कमी वेळ घालवत आहेत. त्यांच्यातील एकटेपणाची भावना दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 60 वर्षांत विभक्त कुटुंबांची संख्याही दुप्पट झाली आहे. पण जेव्हा जागतिक महामारी कोरोनाचे सावट आले आणि ही एकाकीपणाची स्थिती अधिकच गंभीर होत गेली. कोरोना काळात शाळेला जाणे बंद झाले, बऱ्याच जणांचे जॉब गेले, लाखो अमेरिकन लोकांना नातेवाईक किंवा मित्रांपासून दूर घरी एकटे राहावे लागले.

सर्जन जनरलच्या अहवालात असे आढळून आले आहे की, कोरोना व्हायरस साथीच्या आजाराच्या वेळी लोकांनी त्यांच्या मित्र गटांपासून अलिप्त राहण्यास पसंती दिली. मित्रांसोबत कमी वेळ घालवला. अमेरिकन लोक २०२० मध्ये मित्रांसोबत दररोज सुमारे २० मिनिटे व्यतीत करत होते, पण हेच लोक जवळजवळ दोन दशकांपूर्वी दररोज ६० मिनिटे आपल्या मित्रांसोबत वेळ घालवत होते. कोरोना काळात विशेषत: १५ ते २४ वयोगटातील तरुणांमधील एकाकीपणा अधिक वाढला. या वयोगटातील लोकांचा आपल्या मित्रांसोबत वेळ घालवण्यातील ७० टक्के घट नोंदवली गेली आहे.

Loneliness in America : एकाकीपणामुळे अकाली मृत्यूचा धोका 

या अहवालात असेही आढळून आले आहे की, एकाकीपणामुळे अकाली मृत्यूचा धोका सुमारे ३० टक्क्यांनी वाढतो. त्याच बरोबर सामाजिक संबंध  खराब असलेल्यांना देखील स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका जास्त असतो. संशोधनानुसार, विलगीकरणामुळे एखाद्या व्यक्तीला नैराश्य, चिंता आणि स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता वाढते. पण मूर्ती यांनी आपल्या अहवालात एकाकीपणामुळे किती लोक थेट मरतात हे स्पष्ट करणारा कोणताही डेटा मूर्ती यांनी स्पष्ट केलेला  नाही.

डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यासाठी आरोग्य यंत्रणा

सर्जन जनरलमध्ये  कामाची ठिकाणे, शाळा, तंत्रज्ञान कंपन्या, सामुदायिक संस्था, पालक आणि इतर लोकांना देशाची जोडणी वाढवणारे बदल करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर लोकांनी समुदाय गटांमध्ये सामील होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  एकाकीपणामुळे आरोग्याचे धोके ओळखण्यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यासाठी आरोग्य यंत्रणेचा सल्ला दिला आहे.

मुर्ती म्हणाले की,  वाढत्या तंत्रज्ञानाने एकाकीपणाची समस्या झपाट्याने वाढत आहे. सोशल मीडियामुळे विशेषतः एकाकीपणा वाढत आहे. जे लोक दररोज दोन तास किंवा त्याहून अधिक वेळ सोशल मीडिया वापरतात, ३० पेक्षा कमी अशा ॲप्सवर असणा-या लोकांपेक्षा दुप्पट असतात त्यांच्यात एकाकीपणा वाढत आहे. अहवालामध्ये मूर्ती  म्हणतात, "व्यक्तिगत संवादाला खरोखर पर्याय नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news