Lok Sabha Elections | प्रचारकाळात गाडी कोणतीही वापरा फक्त खर्चाच्या तक्त्यात बसवा, उमेदवारांच्या वाहनांचे दर निश्चित

Lok Sabha Elections | प्रचारकाळात गाडी कोणतीही वापरा फक्त खर्चाच्या तक्त्यात बसवा, उमेदवारांच्या वाहनांचे दर निश्चित
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभेच्या निवडणुकीचा जोर वाढत चालला असून, आता प्रचाराचा देखील जोर वाढला आहे. यामध्ये प्रचारकाळात वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे दर निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांना रोजच्या खर्चामध्ये वाहनाच्या खर्चाचादेखील समावेश असणार आहे. यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत वाहनांचे प्रमाणित दर निश्चित करण्यात आले आहे.

निवडणूक म्हटली की प्रचार आला. पूर्वी प्रचारासाठी हातगाड्यांचा वापर केला जायचा. त्यानंतर रिक्षा, छोटे टेम्पो यांचा वापर व्हायला लागला. हल्ली मात्र मोठमोठ्या कार, बसेस, बसेसवर फ्लेक्स, एलसीडी स्क्रीन यांचा वापर होताना दिसत आहे. सध्याच्या प्रचलित दरांसह हे दर निश्चित करण्यात आले आहेत. या माध्यमातून जनतेमध्ये जाताना हातात पॅम्पलेट आणि एलसीडीवर चलतचित्राद्वारे प्रचार करण्यात येत आहे.

निवडणूक विभागाने तयार केलेल्या परिपत्रकात वाहनाचे नाव, त्याचे २४ तास २४० किमीसाठी दर तसेच १२ तास १२० किमीसाठी दर आणि हे निश्चित झालेले प्रमाण पूर्ण झाल्यानंतर किती रुपये प्रतिकिमी आकारायचे हे निश्चित करण्यात आले आहे.

दरपत्रक

वाहन प्रकार२४ तास१२ तासनिश्चित वेळ पूर्ण झाल्यावर प्रति किलोमीटर
रिक्षा₹८८०₹४४०₹९
टॅक्सी₹२२००₹११००₹९
जीप, टेम्पो, बोलेरो, टाटा सुमो, विक्ट्रा, क्वाॅलिस, तवेरा₹२७५०₹१३७५₹११
टाटा इंडिका₹१९००₹९५०₹८
इंडिगो, फोर्ड, स्विफ्ट₹२६००₹१३००₹११
इनोव्हा₹३३००₹१६५०₹१४
बस २० सीटर₹४८५०₹२४२५₹२०
टाटा एलईडीप्रति वाहन प्रतिदिन₹१००००
आयशर ४०७प्रति वाहन प्रतिदिन₹१००००
जीप रथप्रति कार्यक्रम₹३३००

रॅलीमध्ये वाहनांच्या संख्येवर निर्बंध नाही. मात्र, वाहनांच्या ठराविक संख्येनंतर मोकळी जागा सोडणे आवश्यक आहे. त्यासोबतच वाहनांचे देण्यात आलेल्या दरपत्रकामध्ये ती वाहने बसविण्यात यावी. त्यासाठीचा खर्च दाखविण्यात यावा.

– शशिकांत मंगरुळे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, नाशिक

——

हेही वाचा –

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news