Loksabha Election Photo By Vishal Pujari
Loksabha Election Photo By Vishal Pujari

Lok Sabha Election : काँग्रेसला धक्‍का, वायनाड मतदारसंघातील महासचिव भाजपमध्‍ये दाखल

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राहुल गांधी यांच्या लोकसभा मतदारसंघ वायनाडमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. वायनाडमधील काँग्रेस जिल्हा समितीचे सरचिटणीस सुधाकरन भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

सुधाकरन यांनी आज (दि.२१) भाजपमध्‍ये प्रवेश केला. यानंतर त्‍यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या विकासाच्‍या दृदृष्टिकोनाचे कौतुक केले. केरळच्या भाजप प्रमुखांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून विजयी व्हावे, अशी आपली इच्छा असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

भाजप हा समाजातील अधिक महत्त्‍व असलेा पक्ष आहे. वायनाड लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार के सुरेंद्रन यांना पंतप्रधान मोदींच्या विकास प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी खासदार म्हणून निवड करावी यासाठी प्रयत्नशील राहीन, अशी ग्‍वाहीही त्‍यांनी यावेळी दिली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news