उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, महाजन यांची टिका | पुढारी

उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, महाजन यांची टिका

जळगाव : उद्धव ठाकरेंकडील शिवसेना पक्षाचे चिन्ह व नाव निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाने काढून घेतले आहे. त्यामुळे खरी शिवसेना ही शिंदे यांची असून उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली आहे. त्यांच्याकडे १० टक्केही लोकप्रतिनिधी नाहीत. त्याच्या सोबत कोणीही रहायला तयार नाही. या रागामुळेच त्यांचे मानिसक संतूलन बिघडले आहे. त्यामुळेच त्यांनी भाजपवर अगदी खालच्या पातळीवर भाष्य केल्याचे टिका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. महाजन म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून खरे इतक्या खालच्या पातळीवरील टिकेची अपेक्षा नव्हती. मात्र, त्यांच्याकडील आमदार, खासदार हे त्यांच्यासोबत रहायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. त्यामुळेच त्यांचे मानसिक स्वास्थ बिघडले असून ते अशा प्रकारच्या टिका करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button