पुढारी ऑनलाईन डेस्क : नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंग संधू यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगात रुजू होऊन कामकाजाची सुत्रे हाती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील त्रिसदस्यीय समितीने ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड केली आहे. अरुण गोयल यांनी निवडणूक आयुक्त म्हणून तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर राजीव कुमार हे एकच निवडणूक आयुक्त होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्रिसदस्यीय समितीने या नावांची निवड केली आहे. या दोन्ही नावांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. या संदर्भातील अधिसूचना कायदा मंत्रालयाद्वारे काढण्यात आली. मात्र नावे निवडण्याच्या या एकूण प्रक्रियेवरून काँग्रेसने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आलेले ज्ञानेश कुमार हे केरळमधील तर सुखबीर सिंग संधू हे पंजाबमधील आहेत. ज्ञानेश कुमार हे १९८८ च्या बॅचचे केरळ कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी गृह मंत्रालयात काम केले आहे. कलम ३७० संदर्भात निर्णय घेताना ते गृहमंत्रालयात कार्यरत होते. त्यासोबतच सुखबीर सिंग संधू हे उत्तराखंड राज्याचे मुख्य सचिव आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष राहिले आहेत.
हे ही वाचा :