राज्यातील मद्यविक्री 23 टक्क्यांनी वाढली!

राज्यातील मद्यविक्री 23 टक्क्यांनी वाढली!
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील मद्यविक्रीत वर्षभरात तब्बल 23 टक्क्यांची वाढ झाली असून, त्यामुळे सरकारला करातून मिळणार्‍या उत्पन्नात 25 टक्क्यांची भर पडली आहे.

सन 2021-22 आणि 2022-23 या वर्षांची तुलनात्मक आकडेवारी नुकतीच राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केली. त्यानुसार गेल्या कित्येक दशकांतील ही सर्वोच्च वाढ आहे. विविध करांमुळे मद्याचे दर वाढलेले असले, तरी त्याचा खप वाढतच चालला आहे. त्याचा परिणाम म्हणून 2022-23 मध्ये सरकारला तब्बल 21 हजार 550 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. ही वाढ गतवर्षाच्या तुलनेत 25 टक्केआहे. यात बिअर आणि वाईनचा वाटा मोठा आहे.

कोल्हापूर, संभाजीनगर आघाडीवर

उत्पादन शुल्क खात्याच्या नागपूर, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागांतील मद्यविक्री मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक विभागांच्या तुलनेत प्रचंड वाढली. नागपूरमध्ये 42.9 टक्के, छत्रपती संभाजीनगरात 29.7 टक्के, तर कोल्हापुरात 28.5 टक्क्यांनी उत्पन्न वाढले. मुंबई, ठाणे, पुणे व नाशिक विभागांत 23 टक्क्यांनी वाढले.

बिअर, वाईनमुळे…

'द असोसिएशन ऑफप्रोग्रेसिव्ह रिटेल लिकर व्हेंडर्स'चे उपाध्यक्ष सुमित चावला म्हणाले, राज्य सरकारने बिअर आणि वाईनवरील निर्बंध घटविल्यामुळे विशेषत: नागपूर, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरात विक्रीचे प्रमाण वाढले. सरकारने जर बिअरवरील कर कमी केला, तर मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे विभागांत विक्रीत प्रचंड वाढ होऊ शकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news