Lionel Messi : लिओनेल मेस्सीने पटकावला फिफा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब
पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्जेंनटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने (Lionel Messi) फिफाच्या सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कारावर (2022 चा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू) मोहोर उमटवली. मेस्सीने फ्रान्सच्या एम्बाप्पेला मागे टाकून फुटबॉल जगतातील हा मानाचा पुरस्कार पटकावला.
फिफाचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब पटकावण्याची मेस्सीची ही दुसरी वेळ आहे. राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक आणि कर्णधार, पत्रकार आणि चाहतेही हा पुरस्कार देण्यासाठी मतदान करतात. यंदा लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाला फिफा विश्वचषक विजेतेपद पटकावण्यात यश आले. (Lionel Messi)
मेस्सीसह अर्जेंटिनाला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देणारे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांना सर्वोत्कृष्ट पुरुष प्रशिक्षकाचा किताब देण्यात आला आहे. एमिलियानो मार्टिनेझने सर्वोत्कृष्ट पुरुष गोलकीपरचा पुरस्कार जिंकला तर अर्जेंटिनाच्या चाहत्यांना प्रथमच सर्वोत्कृष्ट चाहत्यांचा पुरस्कार मिळाला.
पुरस्कार विजेत्यांची यादी
- अर्जेंटिना – फिफा फॅन अवॉर्ड 2022
- लुका लोचाशविली – फिफा फेअर प्ले अवॉर्ड
- लिओनेल स्कालोनी – फिफा पुरुष प्रशिक्षक 2022
- सरिना विग्मन – फिफा महिला प्रशिक्षक 2022
- मार्सिन ओलेक्सी – फिफा पुस्कास पुरस्कार (सर्वोत्कृष्ट गोल)
- एमिलियानो मार्टिनेझ – फिफा पुरुष गोलकीपर पुरस्कार 2022
- मेरी एर्प्स – फिफा महिला गोलकीपर 2022
हेही वाचा;

