Friend Crush Trend: प्रेम नाही, तरीही त्या व्यक्तीची ओढ! Gen Z मध्ये ‘फ्रेंड क्रश’ची चर्चा; नेमकं काय आहे हे नवीन प्रकरण?

Friend Crush Trend: एखादी व्यक्ती आवडते, तिच्याशी बोलावेसे वाटते, तिच्यासोबत फिरण्याचीही इच्छा होते; पण प्रेमसंबंध नको असतात! Gen Z च्या या नव्या ट्रेंडमागचं कारण काय?
Friend Crush Trend
Friend Crush TrendPudhari
Published on: 
Updated on: 

Friend Crush Trend: सध्या तरुणाईच्या जगात नवनवीन ट्रेंड आणि संकल्पना पाहायला मिळत आहेत. कधी ‘घोस्टिंग’, तर कधी ‘सिच्युएशनशिप’ अशा शब्दांची चर्चा सोशल मीडियावर सुरू असते. आता यामध्ये आणखी एका नव्या संकल्पनेची भर पडली आहे. ती म्हणजे ‘फ्रेंड क्रश’! एखादी व्यक्ती आपल्याला आवडते, पण तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण करण्याची इच्छा नसते. उलट, त्या व्यक्तीशी छान मैत्री व्हावी, तिने आपल्या मित्रपरिवाराचा भाग व्हावे, असे वाटते. याच भावनेला ‘फ्रेंड क्रश’ असे म्हटले जाते. Gen Z म्हणजेच नव्या पिढीमध्ये हा ट्रेंड लोकप्रिय होताना दिसत आहे.

‘फ्रेंड क्रश’ म्हणजे नेमकं काय?

एखाद्या व्यक्तीचे बोलणे, वागणे, विनोद करण्याची पद्धत, कपड्यांची निवड किंवा संगीताची आवड आपल्याला खूप आवडते. त्या व्यक्तीचा स्वभाव आपल्याला भावतो. त्यामुळे तिच्याशी अधिक बोलावे, एकत्र वेळ घालवावा आणि चांगली मैत्री करावी, असे वाटू लागते. मात्र, या आकर्षणामध्ये प्रेम किंवा प्रेमसंबंधांची भावना नसते. केवळ मैत्री करण्याची इच्छा असते. यालाच ‘फ्रेंड क्रश’ म्हणतात.

उदाहरणार्थ, एखाद्या पार्टीमध्ये तुमची एका व्यक्तीशी ओळख होते. तिचा विनोद करण्याचा अंदाज आणि बोलण्याची पद्धत तुम्हाला आवडते. किंवा सोशल मीडियावर एखाद्याची पोस्ट पाहून त्याची संगीताची आवड तुमच्याशी मिळतीजुळती असल्याचे जाणवते. अशावेळी त्या व्यक्तीसोबत मैत्री करावी, असे तुम्हाला वाटू शकते. हीच फ्रेंड क्रशची भावना आहे.

Friend Crush Trend
Mahesh Manjrekar: सात वर्षे साथ दिली, मग अचानक...; 'आमने-सामने' वादावर महेश मांजरेकरांचा मोठा खुलासा, म्हणाले, 'हे खूप अनफेअर...'

आता हे कसं ओळखायचं?

तुम्हाला एखाद्या व्यक्तीसोबत मैत्री करण्याची तीव्र इच्छा होत असेल, तर काही गोष्टींमधून ही भावना ओळखता येऊ शकते.

१. सोशल मीडियावर त्याच्या पोस्ट पाहण्याची उत्सुकता

तुम्ही त्या व्यक्तीच्या इन्स्टाग्राम स्टोरी आणि पोस्ट आवडीने पाहता. तिच्या आयुष्यात काय सुरू आहे, तिला कोणत्या गोष्टी आवडतात, याबद्दल तुम्हाला उत्सुकता वाटते.

२. आवडीच्या विषयांवर गप्पा मारण्याची इच्छा

तुम्हाला त्या व्यक्तीसोबत आवडते गाणे, चित्रपट, वेबसीरिज किंवा इतर विषयांवर मनमोकळ्या गप्पा माराव्याशा वाटतात. तुमच्या दोघांच्या आवडी सारख्या असाव्यात, असेही तुम्हाला वाटते.

३. त्या व्यक्तीने आपल्याकडे लक्ष द्यावे असे वाटणे

तिने आपल्याला ओळखावे, आपल्याशी बोलावे आणि मैत्रीची सुरुवात व्हावी, अशी तुमची इच्छा असते. अनेकदा स्वतःहून बोलण्याची संधी शोधली जाते. मात्र, संवादाची सुरुवात कशी करावी, हे समजत नाही.

४. विचार आणि आवड जुळत असल्याची जाणीव

त्या व्यक्तीचा स्वभाव, विनोद करण्याची पद्धत आणि विचार तुम्हाला आपल्यासारखे वाटतात. आपली तिच्यासोबत चांगली मैत्री होऊ शकते, असे तुम्हाला जाणवते.

५. एकत्र फिरण्याचे प्लॅन करण्याची इच्छा

ती व्यक्ती आपल्या मित्रपरिवाराचा भाग व्हावी, असे तुम्हाला वाटते. एकत्र कॅफेमध्ये जाणे, चित्रपट पाहणे किंवा वीकेंडला फिरायला जाणे, असे अनेक प्लॅन तुमच्या मनात येऊ लागतात.

Friend Crush Trend
Shah Rukh Khan King Movie: चित्रपट रिलीज व्हायचाय, पण शाहरुखच्या ‘किंग’ने आधीच रचला इतिहास! बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

Gen Z मध्ये ‘फ्रेंड क्रश’चा ट्रेंड लोकप्रिय का होतोय?

सोशल मीडियामुळे आजच्या तरुणांना दररोज अनेक नवीन लोकांशी बोलण्याची संधी मिळते. इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यक्तींचे विचार, आवडी आणि जीवनशैली समजतात. मात्र, प्रत्येक वेळी एखादी व्यक्ती आवडली म्हणजे तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण करायचे असतातच असे नाही.

अनेक तरुणांना समान आवड असणारे मित्र हवे असतात. ज्यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारता येतील, आवडीच्या गोष्टी शेअर करता येतील आणि कोणताही संकोच न ठेवता वेळ घालवता येईल, अशा मैत्रीची त्यांना अपेक्षा असते.

एखादी व्यक्ती आवडण्यासाठी प्रेमात पडणे गरजेचे नाही, तर कधी कधी तिच्यासोबत फक्त छान मैत्री करण्याची इच्छा असू शकते. त्यामुळेच Gen Z च्या सोशल लाइफमध्ये या नव्या ट्रेंडची चर्चा वाढताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.