Face Wash Tips | फेस वॉश करताना या चुका टाळा, नाहीतर त्वचा होईल निस्तेज

Face Wash Tips | चेहऱ्याची काळजी घेणे प्रत्येक महिलेसाठी महत्त्वाचं असतं.
Face Wash Tips
Face Wash Tips Canva
Published on
Updated on

Face Wash Tips

चेहऱ्याची काळजी घेणे प्रत्येक महिलेसाठी महत्त्वाचं असतं. अनेकांना वाटतं की दिवसात जितक्या वेळा फेस वॉश करू, तितकी त्वचा स्वच्छ राहील. पण ही सवय चुकीची ठरू शकते. कारण खूप वेळा फेस वॉश केल्याने त्वचेला नुकसान होऊ शकतं.

Face Wash Tips
Cortisol hormone diet tips: स्ट्रेस हार्मोन 'कॉर्टिसोल' कमी करायचंय? आहारातील ‘ही’ पोषक तत्वे आहेत रामबाण उपाय

दिवसात किती वेळा करावा फेस वॉश?

त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आंचल सांगतात की दिवसात फक्त दोन वेळाच फेस वॉश करावा –

  • सकाळी: रात्री झोपताना चेहऱ्यावर साचलेलं तेल, धूळ, घाम हे काढण्यासाठी.

  • रात्री झोपण्यापूर्वी: दिवसभरात चेहऱ्यावर जमा झालेली धूळ, प्रदूषण, मेकअपचे अवशेष काढण्यासाठी.
    यापेक्षा जास्त वेळा फेस वॉश केल्याने त्वचेची नैसर्गिक ओलसरता कमी होते आणि ती कोरडी, निस्तेज दिसू लागते.

वारंवार फेस वॉश केल्याने होणारे धोके

  1. त्वचेची प्रोटेक्टिव्ह लेयर नष्ट होते – ओव्हर-क्लिंजिंगमुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक तेलं निघून जातात.

  2. रेडनेस आणि खाज येते – स्किन जास्त कोरडी झाल्याने ती संवेदनशील होते आणि रॅशेस येऊ शकतात.

  3. पिंपल्स आणि ब्रेकआउट्स वाढतात – कोरडी झालेली त्वचा जास्त तेल तयार करू लागते, ज्यामुळे पिंपल्स होतात.

  4. निस्तेजपणा येतो – सतत फेस वॉश केल्याने त्वचेतून नॅचरल ग्लो निघून जातो.

Face Wash Tips
How Smartwatch Works | तुमच्या स्मार्टवॉचवरील हार्ट रेट नंबर अचूक आहेत का? जाणून घ्या स्मार्टवॉच हृदयाचे ठोके मोजते कसे....

योग्य फेस वॉश निवडताना लक्षात ठेवायच्या गोष्टी

  • स्किन टाइपनुसार निवड करा – ऑयली स्किनसाठी जेल-बेस्ड फेस वॉश आणि ड्राय स्किनसाठी क्रीम किंवा मॉइस्चरायझिंग फेस वॉश सर्वोत्तम.

  • केमिकल्स टाळा – हार्श केमिकल्स, सल्फेट्स किंवा आर्टिफिशियल सुगंध असलेले फेस वॉश टाळा.

  • नैसर्गिक घटक असलेले निवडा – अ‍ॅलोवेरा, गुलाबजल, चंदन, हळद यांसारखे नैसर्गिक घटक असलेले फेस वॉश स्किनसाठी सुरक्षित असतात.

फेस वॉश योग्य पद्धतीने कसा करावा?

  1. कोमट पाण्याने चेहरा धुवा.

  2. फेस वॉश हातावर घेऊन हलक्या हातांनी गोलाकार मसाज करा.

  3. खूप जोरात घासू नका, यामुळे त्वचेला मायक्रो-डॅमेज होऊ शकतं.

  4. फेस वॉश केल्यानंतर हलक्या टॉवेलने चेहरा पुसा.

  5. लगेच मॉइस्चरायझर लावा जेणेकरून त्वचेतील ओलसरता टिकून राहील.

लक्षात ठेवा

घाम आल्यावर, व्यायामानंतर किंवा बाहेरून आल्यावर चेहरा धुणं आवश्यक आहे. पण यासाठी माइल्ड फेस वॉश वापरा आणि वारंवार धुणं टाळा. योग्य पद्धतीने फेस वॉश केल्याने त्वचा नेहमी तजेलदार, स्वच्छ आणि निरोगी राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news