Leena Nair : अभिमानास्पद! कोल्हापूरच्या लीना बनल्या फ्रान्स लग्झरी ग्रुप Chanel च्या सीईओ

Leena Nair : अभिमानास्पद! कोल्हापूरच्या लीना बनल्या फ्रान्स लग्झरी ग्रुप Chanel च्या सीईओ
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

मूळ भारतीय असलेल्या ५२ वर्षीय लीना नायर (Leena Nair) यांची फ्रान्स लग्झरी ग्रुप Chanelच्या सीईओपदी नियुक्ती झाली आहे. लीना नायर ह्या आतापर्यंत युनिलिव्हरमध्ये मुख्य मानव संसाधन अधिकारी (Chief Human Resources Officer) म्हणून कार्यरत होत्या. आता त्या जानेवारीमध्ये फ्रान्स लग्झरी ग्रुप Chanelच्या सीईओपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. अभिमानाची गोष्ट म्हणजे लीना ह्या मुळच्या कोल्हापूरच्या आहेत.

लीना यांनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडमध्ये १९९२ मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून करियरची सुरुवात केली होती. तिथे त्या Chief human resources officer (CHRO) पदापर्यंत पोहोचल्या. हिंदुस्तान लिव्हरने नंतर आपले नाव बदलून युनिलिव्हर असे केले. तिथे लीना ह्या पहिल्या आशियाई आणि कमी वयाच्या CHRO बनल्या.

गोल्ड मेडलिस्ट लीना…

लीना (Leena Nair) ह्या कोल्हापूरच्या असून त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातील होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झाले. त्यानंतर सांगलीत त्यांनी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमधून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जमशेदपूर येथील झेविअर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी एमबीए डिग्री शिक्षण घेतले. त्या त्यांच्या बॅचच्या गोल्ड मेडलिस्ट आहेत.

त्यांनी लिप्टन (इंडिया) फॅक्टरीसह तीन वेगवेगळ्या ठिकाणी पर्सनल मॅनेंजर म्हणून काम केले आहे. नायर २०१३ मध्ये युनिलिव्हरच्या वरिष्ठ उपाध्यक्ष, एचआर बनल्या. त्यांनी कंपनीच्या ग्लोबल हेड म्हणून देखील जबाबदारी सांभाळली. त्यानंतर २०१६ मध्ये त्या लंडनमधील युनिलिव्हर लीडरशिप एक्झिक्युटिव्ह (ULE) मध्ये रुजू झाल्या.

लीना यांचे आधीचे सहकारी युनिलिव्हरचे सीईओ अॅलन जोप यांच्या मते, फ्रान्स लग्झरी ग्रुप Chanelच्या नवनियुक्त सीईओ लीना यांची युनिलिव्हरमधील संपूर्ण कारकीर्द ही अव्वल राहिली आहे. त्या आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत. कंपनीला जागतिक स्तरावर नेण्यास त्यांची भूमिका महत्वाची राहिली.

लीना यांनी युनिलिव्हरच्या एक्झिक्युटिव्ह प्रोफाइल पेजवर म्हटले आहे की, "माझा उद्देश हा चांगल्या व्यवसायासाठी आणि जग अधिक सुंदर करण्यासाठी मानवी प्रतिभेचा वापर होणे हा आहे."

हे ही वाचा :

 

View this post on Instagram

 

A post shared by Leena Nair (@leenanairhr)

 

View this post on Instagram

 

A post shared by Leena Nair (@leenanairhr)

 

View this post on Instagram

 

A post shared by Leena Nair (@leenanairhr)

 

View this post on Instagram

 

A post shared by Leena Nair (@leenanairhr)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news