सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जाहीर केली ‘ही’ नियमावली

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जाहीर केली ‘ही’ नियमावली
Published on
Updated on

मुंबई, पुढारी ऑनलाइन: कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी धोका कायम असल्याने राज्य सरकारने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नियमावली घालून दिली आहे. कोरोना नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा यासाठी सरकार विशेष खबरदारी घेत आहे. गृहविभागाने यासाठी नियमावली जाहीर केली आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ही नियमावली जाहीर केली असून त्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

काय आहे नियमावली?

  • सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांनी महापालिका किंवा स्थानिक प्रशासन यांची धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक.
  • महापालिका किंवा संबंधित प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.
  • या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा.
  • घरगुती आणि सार्वजनिक गणपतींची सजावट करताना साधेपणा असावा, त्यात भपकेबाजी नसावी.
  • श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट आणि घरगुती गणपतीकरिता २ फुटांच्या मर्यादेत असावी.
  • या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे.
  • मुर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे.
  • घरी विसर्जन करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रीम विसर्जन कुंडांमध्ये विसर्जन करावे.
  • उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा.
  • जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे.
  • आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.
  • सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करावीत.
  • रक्तदान शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे.
  • शिबिरांमध्ये कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच जनजागृती करण्यात यावी.
  • लागू करण्यात आलेले निर्बंध वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील.
  • त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कुठलीही शिथिलता देता येणार नाही.
  • आरती, भजन, किर्तन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणांसंदर्भातील नियमांचे व तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे
  • श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
  • विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे.
  • लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विसर्जनस्थळी जाणे टाळावे.
  • संपूर्ण चाळीतील, गल्लीतील घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाचा मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत.

हेही वाचा: 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news