सातारा जिल्हा बँक: 52 मतदार ठरविणार मंत्री देसाई, पाटणकरांचे भवितव्य

सातारा जिल्हा बँक: 52 मतदार ठरविणार मंत्री देसाई, पाटणकरांचे भवितव्य
Published on
Updated on

सातारा जिल्हा बँक सातारा जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या पाटण सोसायटी मतदार संघातील गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या सहकारातील निवडणुकीकडे सार्वत्रिक नजरा लागल्या आहेत. वातावरणात आता विधानसभेच्या रणसंग्रामाप्रमाणे तापले आहे . एकूण 102 पैकी 52 मते मिळवणारा उमेदवार विजयी होईल.स्वाभाविकच या 52 मतदारांच्या मतदानावर तालुक्याचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे

सातारा जिल्हा बँक जिल्हा बँकेत अनेक वर्षांपासून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकरांचा कायमच वरचष्मा राहिला आहे. स्वतःसह त्यांनी निष्ठावंत असलेल्या स्व. तात्यासाहेब दिवशीकर, एल.एम.पवार, सौ. मंगल पवार, सौ. देशमुख आदींना जिल्हा बँकेत संधी दिली होती. अगदी ना. देसाई यांचे पिताश्री स्व. शिवाजीराव देसाई यांचाही स्व.तात्यासाहेब दिवशीकर यांचेकडून पराभव करण्यात पाटणकरांना यश आले होते. गेल्या अनेक वर्षांत देसाई गटाकडून स्वतःच्या घराण्यातील उमेदवार न देता पाटणकरांना शह देण्यासाठी कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आली. यामध्ये काही वेळा पाटणकर बिनविरोध गेले तर काही वेळा केवळ तांत्रिक कुस्त्या झाल्या. यावेळची निवडणूक ही राजकीय प्रतिष्ठा व अस्तित्वाची ठरणार आहे. स्वतः ना. देसाई हे पहिल्यांदाच निवडणूक

लढवत आहेत. राज्यासह जिल्ह्यातील त्यांचा राजकीय दबदबा, प्रतिष्ठा व आगामी काळातील राजकारणावर यातील जय-पराजयाचे परिणाम दिसून येतील. ना. देसाई यांनी अतिशय आत्मविश्वासाने उमेदवारी केलीय यात शंकाच
नाही. त्यांना कोणत्याही परिस्थितीत विजयी व्हावेच लागेल, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे .

बँकेत सातत्याने विजय मिळवत आलेल्या पाटणकर गटाकडूनही यावेळी पहिल्यांदाच सत्यजितसिंहांना संधी देण्यात आली असून त्यांच्या दृष्टीनेही ही निवडणूक तितकीच महत्त्वाची आहे. ना. देसाई यांच्याकडून त्यांचा सन 2014 व 2019 मध्ये सलग दोन वेळा झालेल्या पराभवानंतर त्यांनी सहकारी संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेतही एकहाती सत्ता मिळविली. आता विधानसभेचा पराभवाचा वचपा भरून काढत जिल्ह्यातील राजकारणात ताठमानेने एंट्री करण्याची स्वाभाविकच ही संधी आहे. पाटण विधानसभा मतदारसंघ चार्ज करण्यासाठी व पदाधिकारी कार्यकर्त्यांनाही हा विजय राजकीय बूस्टर ठरणार आहे. एकूणच जिल्हा बँक निवडणुकीत पाटण सोसायटी मतदार संघातील ना. देसाई विरुद्ध सत्यजितसिंह पाटणकर यांच्यातील ही लढत अगदी विधानसभेचा आखाडा होऊन बसल्याचे चित्र आहे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news