स्प्लीन / पांथरी वाढणे’ आणि उपचार | पुढारी

स्प्लीन / पांथरी वाढणे’ आणि उपचार

डॉ. आनंद ओक

पोटामध्ये डाव्या बाजूस वरील कोपर्‍यात syphilis (स्प्लीन) अवयव असतो. रक्तात नको असलेले जीवजंतू नाश करण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेणे, रोगप्रतिकारशक्ती टिकविणे, तांबड्या पेशी, plate lets, यांचे निराकरण करणे अशी जीवनावश्यक कार्ये स्प्लीन करत असते. काहीवेळा या स्प्लीनचा आकार वाढल्यामुळे विविध आरोग्य समस्या उत्पन्न होतात.

लिव्हरच्या विकाराप्रमाणेच स्प्लीनच्या विकारातही आयुर्वेदिय उपचार पद्धतीचा उत्तम उपयोग होतो.

स्प्लीन / पांथरी वाढण्याची कारणे

टायफॉईड, टी.बी. syphilis आदी. जीवाणू संसर्ग हिपॅटायसीस, मलेरिया, अ‍ॅनिमियाचा विकार यामुळे स्प्लीन वाढत असते. काही हृदयविकार, Portal hypotension, लिव्हरच्या शिरेतील गाठ, स्प्लीनच्या शिरेतील अवरोध यामुळेदेखील जास्त वाढते. Acute Heukemia, Lymphome या कॅन्सरच्या प्रकारात देखील स्प्लीन वाढलेली आढळते. काही वेळा स्प्लीन वाढण्याचे कोणतेही कारण सापडत नाही.

स्प्लीन वाढल्यानंतरच्या तक्रारी

स्प्लीन वाढल्यामुळे पोट फुगणे, अस्वस्थता, भुकेच्या तक्रारी, पोटाचा आकार वाढणे, पचन बिघाड, लघवीला साफ न होणे, पोट दुखणे या प्राथमिक तक्रारी जाणवतात.

याचबरोबर हिमोग्लोबिन कमी होऊन पांढर्‍या पेशींची संख्या कमी होते. स्प्लीनचा आकार आणखी वाढल्यास पोट आणखी फुगून त्यामध्ये पाणी साठू लागते. श्वास घेण्यास त्रास होतो, रक्ताची टक्केवारी अधिक कमी होऊन अशक्तपणा वाढतो, अंगात ताप राहणे, पायाला गोळे येणे, मळमळणे, भूक खूप कमी होणे आदी लक्षणे दिसू लागतात. त्वचेचा वर्ण काळवंडून त्वचा कोरडी होते. अनेकदा या जोडीला लिव्हरचा आकार वाढल्याचे आढळते.

स्प्लीन वाढल्यानंतर रक्त लघवीच्या तपासण्या, तसेच पोटाची सोनोग्राफी, एक्स-रे, सीटी स्कॅनच्या तपासण्यांनी स्प्लीन(syphilis) वाढण्याचे कारण शोधले जाते. काहीवेळा Bone marrow Test, Liver Biopsy या तपासण्याही कराव्या लागतात.

स्प्लीन वाढण्यावरील आयुर्वेदिय उपचार

वाढलेली स्प्लीन कमी करण्यासाठी अष्टविध परीक्षांनी रुग्णपरीक्षण करून औषधी योजना ठरवली जाते. पुंखा, रोहितक, कुमारी, पुनर्नवा, यवक्षार, वजक्षार, मंड्रभस्म, ताम्रभस्म, प्रवाळ पंचामृत, गोमूत्र आदीपासून तयार झालेली संयुक्त औषधे वापरली जातात. वाढलेल्या स्प्लीनबरोबरच जलोदर झालेला असल्यास या उपचारांबरोबरच पोटाला औषधी तेल लावून, अर्कपन्न उदरपट्टबंधन हा उपक्रम केला जातो. काहीवेळा सिराव्यध करून रक्तमोतण, विरेचन यांचीही मदत घ्यावी लागते.

वरील आयुर्वेदिक उपचार सुरू केल्यानंतर रुग्णाची भूक वाढते. स्प्लीनचा आकार कमी होऊन फुगलेले पोट कमी होते. पचनशक्ती सुधारून अशक्तपणा कमी होऊन रक्ताची टक्केवारी सुधारते. जलोदर झाला असल्यास पोटातील पाणी कमी होऊन श्वासाचा त्रास बंद होतो. चिकाटीने उपचार सुरू ठेवल्यास स्प्लीनचा आकार खूप कमी होऊन आरोग्य संपन्न जीवन प्राप्त होते.

Back to top button