सांगली : राष्ट्रवादीला २१ गावांत यश, शिंदे गटाचे १४, भाजपचे १२ ठिकाणी सरपंचपदाचे उमेदवार विजयी

सांगली : राष्ट्रवादीला २१ गावांत यश, शिंदे गटाचे १४, भाजपचे १२ ठिकाणी सरपंचपदाचे उमेदवार विजयी

सांगली;पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची मतमोजणी सध्या सुरू आहे. आत्तापर्यंत आलेल्या निकालामध्ये राष्ट्रवादीला २१ ठिकाणी यश मिळाले आहे. २१ ठिकाणच्या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी आघाडीवर आहे. तसेच शिंदे गटाला १४, भाजप १२, काँग्रेस ६ तर इतर ६ ठिकाणी सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी मोठ्या चुरशीने सुरू आहे. त्यामध्ये सध्या तरी राष्ट्रवादीने आघाडी घेतलेली दिसत आहे.

जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. यामध्ये मिरज तालुक्यातील ३६, तासगाव तालुक्यातील २६, कवठेमहांकाळ तालुक्यातील २८, जतमधील ८१, खानापूरमधील ४५, आटपाडीतील २५, पलूसमधील १५, कडेगावमधील ४३, वाळव्यातील ८८ व शिराळ्यातील ६० ग्रामपंचायतींचा सहभाग आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंच आणि सदस्यपदांच्या ४७१६ जागांसाठी तब्बल १६ हजार ६५ उमेदवारांचे १६ हजार ४४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सरपंचपदाच्या ४४७ जागा आहेत. सरपंचपदाच्या जागेसाठी २ हजार ४५१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी ३८ गावच्या कारभार्‍यांची बिनविरोध निवड झाली आहे.

हेही वाचा:

logo
Pudhari News
pudhari.news