सांगली : कुपवाड मध्ये सांबराच्या एन्ट्रीने खळबळ

सांबराच्या एन्ट्रीने खळबळ
सांबराच्या एन्ट्रीने खळबळ

सांगली : पुढारी वृत्तसेवा कुपवाड (ता. मिरज) येथे एक पूर्ण वाढ झालेले सांबर दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी वन विभाग आणि पोलिस दाखल झाले असून, सांबराला रेस्क्यू करण्याचे काम सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कुपवाड ते मिरज रस्त्यावर एका ठिकाणी पूर्ण वाढ झालेली सांबर काही जणांना दिसून आले. गावात सांबर दिसल्‍याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले. त्याला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु मोकळ्या जागेमध्ये सांबर सैरभैर पळत असल्याने त्याला रेस्क्यू करण्यामध्ये अडचणी येत आहेत. दरम्यान सांबर पाहण्यासाठी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news