सचिन गोव्यातील कॅसिनो व्यवस्थापनाला कायदेशीर धडा शिकवणार

सचिन गोव्यातील कॅसिनो व्यवस्थापनाला कायदेशीर धडा शिकवणार

पणजी : पुढारी वृत्तसेवा : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या छायाचित्राचा वापर गोव्यातील एका कॅसिनो व्यवस्थापनाने केला आहे. समाज माध्यमातून करण्यात येणाऱ्या जाहिरातींवर कॅसिनोबरोबर सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) याचे छायाचित्र वापरल्याने त्याने आता या कॅसिनो व्यवस्थापना विरुद्ध कायदेशीर पावले उचलण्याची तयारी सुरू केली आहे.

सचिन तेंडुलकर याने आपल्या ट्विटर पेजवर ट्विट करीत ही माहिती दिली आहे. त्यासाठी त्याने गोव्यात वकील पाठवून त्याची शहानिशा करण्यास सांगितल्याची माहिती पुढे आली आहे.

आपण कॅसिनोला उत्तेजन देत असल्याची जाहिरात समाज माध्यमातून केली जात आहे. त्यासाठी आपल्या छायाचित्राचा वापर करण्यात आला आहे. गैरप्रकारे आपल्या छायाचित्राचा वापर करून समाजात कॅसिनोला उत्तेजन देत असल्याचा गैरसमज पसरवला जात आहे.

जनतेची दिशाभूल करणारा हा प्रकार आपल्याला रुचला नाही. त्याचबरोबर या प्रकारामुळे आपणास दुःख झाले आहे. हे अत्यंत वाईट आहे. आपण जुगार, मटका, तंबाखू सिगारेट आणि मद्यपानासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या कधीच पाठिंबा दिला नाही. आपल्या छायाचित्राचा समाज माध्यमात गैर वापर केला जात आहे, हे निंदनीय आणि क्लेशदायक असल्याचे तेंडुलकरने म्हटले आहे.

sachin tendulkar : बॉलिवूड कलाकार देतात प्रोत्साहन

सिगारेट किंवा गुटख्याच्या जाहिराती करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांना गोव्यातील जागृत नागरिकांनी ताळ्यावर आणले आहे. नुकत्याच एका जाहिरातीबद्दल बिग बी यांनासुद्धा नोटीस गेली होती. अद्याप कॅसिनोंच्या जाहिराती बॉलिवूड कलाकार करीत आहेत. तेंडुलकरच्या इमेजचा वापर आपल्या व्यवसायासाठी करण्याचा प्रयत्न येथील एका कॅसिनोने केल्याने आणखी एका प्रकरणाची भर आता अशा अवैध घटनांच्या यादीत पडली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news