#UkraineRussia : एकाच अटीवर युक्रेनशी चर्चा होणार, रशियाकडून ग्रीन सिग्नल! | पुढारी

#UkraineRussia : एकाच अटीवर युक्रेनशी चर्चा होणार, रशियाकडून ग्रीन सिग्नल!

पुढारी ऑनलाईन डेस्क : #UkraineRussia : युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाने चर्चेसाठी सहमती दर्शवली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी रशिया चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे की, युक्रेनचे सैन्याने शस्त्रे खाली ठेवल्यास युद्धाला पूर्णविराम देवून रशिया चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध शिगेला पोहोचले आहे. रशियाने युक्रेनचे मोठे नुकसान केले आहे. आतापर्यंत अनेक जवान शहीद झाले आहेत. आता या विध्वंसानंतर रशिया पुन्हा चर्चेस तयार झाल्याचे समोर आले आहे. रशियन परराष्ट्र मंत्र्यांनी युक्रेनच्या सैनिकांनी शस्त्रे खाली ठेवल्यास पुन्हा चर्चा होऊ शकते, असे स्पष्ट केले आहे.

काल (दि. २४) युक्रेनवर मोठी लष्करी कारवाई केल्यानंतर रशियाने आज (दि. २५) हा प्रस्ताव दिला आहे. मात्र, दुसरीकडे युक्रेनकडून हा प्रस्ताव लगेच स्वीकारणार जाणार नाही अशी परिस्थिती आहे. पण येणा-या काही दिवसांत नक्कीच यावर तोडगा निघू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. युक्रेनला गुडघ्यावर आणायचे आणि नंतर शरणागती पत्करायला लावायची ही रणनीती रशियाकडे आधीच होती. आतापर्यंत युक्रेनने या प्रस्तावाला प्रतिसाद दिलेला नाही.

रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, रशियन सैन्याकडून युक्रेनच्या निवासी भागांवर हल्ले केले जात नसून तेथील पायाभूत सुविधांचे कोणतेही नुकसान झालेले नाही.

मात्र आतापर्यंत रशियाने केलेल्या कारवाईला विरोध सुरू झाला आहे. रशियाचे नागरिक रस्त्यावर उतरून रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या धोरणांचा निषेध करत आहेत. रशियामध्ये आतापर्यंत १७०० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. रशियाशिवाय अमेरिकेतही युक्रेनवरील हल्ल्याविरोधात व्हाईट हाऊसबाहेर निदर्शने करण्यात आली. तर आज (दि. २५) संध्याकाळी भारतातील रशियाच्या दूतावासाबाहेर निदर्शने करण्यात येणार आहेत.

आता त्या निदर्शनांदरम्यान रशियाने पुन्हा चर्चेला बसण्याचे संकेत दिले आहेत. कालच (दि. २४) राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनच्या सैनिकांनी शस्त्रे खाली ठेवली तर युद्ध थांबवले जाईल, असे सांगण्यात आले आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या कारवायांमुळे रशियाला धोका होता, म्हणून आम्ही त्यांच्यावर लष्करी कारवाईला मान्यता दिल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात ठणकावून सांगितले.

Back to top button