शिंदे- फडणवीस सरकार अवैध : जयंत पाटील

शिंदे- फडणवीस सरकार अवैध : जयंत पाटील

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना अधिकृत पक्ष आहे. त्या पक्षाचा प्रतिनिधी कामकाज सल्लागार समितीवर असणे स्वाभाविक होतं, पण का टाळले माहित नाही. याबाबत सर्व विरोधी पक्षांतील नेत्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडशळाने विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली. दरम्यान, शिंदे- फडणवीस सरकार अवैध असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

विधानसभा सल्लागार समितीत ठाकरे गटाला स्थान न दिल्याची तक्रार शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. आज अजित पवार यांनी विरोधी पक्षातील नेत्यांच्या शिष्ठमंडळासह विधानसभा अध्याक्षांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे नेतेही उपस्थित होते. या शिष्ठमंडळात अजित पवार, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, सुनिल प्रभू, अंबादास दानवे आदी उपस्थित होते. दरम्यान विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून शिवसेना-काॅंग्रेसमध्ये मतभेत असल्याचे समोर येत असताना 'उद्धव ठाकरे यांनी विश्वासात घेतलं असतं तर बरं झालं असतं' असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news