मुंबई : पूरग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी 13,600 रुपये भरपाई | पुढारी

मुंबई : पूरग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी 13,600 रुपये भरपाई

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  अतिवृष्टी आणि पुरामुळे हैराण झालेल्या शेतकर्‍यांना हेक्टरी 13 हजार 600 रुपये म्हणजेच दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत हे निर्णय जाहीर केले. यापूर्वी ‘एनडीआरएफ’च्या
निकषांनुसार (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) हेक्टरी 6 हजार 800 रुपये मदत देण्यात येत होती. ती थेट दुप्पट करण्यात आली आहे, असे स्वत: मुख्यमंत्री म्हणाले.

नुकसान भरपाईची कमाल मर्यादा 2 हेक्टरवरून 3 हेक्टर करण्याचा निर्णय देखील विस्तारानंतरच्या या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. यामुळे अतिवृष्टीचा, पुराचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे

Back to top button