ट्रकला धडक
ट्रकला धडक

वाशिम : कोळसावाहू ट्रकला धडक; रस्‍त्‍यातच घेतला पेट

Published on

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : वाशीम जिल्ह्यातील कारंजा- नागपूर रोडवर कारली फाट्यावर दोन ट्रकचा अपघात झाला. या अपघातात कोळसा वाहून नेणाऱ्या ट्रॅकने अचानक पेट घेतला. या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणार नुकसान झाले असून, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र एकजण जखमी झाला आहे.

नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्गावर कारंजा तालुक्यातील कारली फाट्यावर दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात कोळश्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना आज (बुधवार) घडली. दरम्यान कोळसा वाहून नेणाऱ्या ट्रकने अपघातानंतर पेट घेतला. यामध्ये एकजण किरकोळ जखमी झाला आहे. त्यांच्यावर कारंजा येथील रूग्‍णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघाताची माहिती मिळाल्‍यावर कारंजा अग्निशमन दल घटनास्‍थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला, मात्र ट्रकच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news