कर्नाटकची वाहने अडविली ; खेड-शिवापूर टोल नाक्यावरील घटना | पुढारी

कर्नाटकची वाहने अडविली ; खेड-शिवापूर टोल नाक्यावरील घटना

खेड-शिवापूर : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर मंगळवारी (दि. 6) सायंकाळच्या सुमारास कर्नाटकची वाहने अडवली. या वाहनांच्या टायरमधील हवा सोडून त्या वाहनांवर मजय महाराष्ट्रफ लिहून त्यांनी कन्नडीकांचा निषेध केला.  महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या दरम्यान चालू असलेल्या सीमावादाचे पडसाद आता महाराष्ट्रात देखील जाणवू लागले आहेत. या पार्श्भूमीवर कर्नाटकात महाराष्ट्रातील वाहने अडवून तोडफोड करून नुकसान करण्यात आले होते, तसेच महाराष्ट्रविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर

पुण्यातील स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास खेड-शिवापूर टोल नाक्यावर कर्नाटकच्या बस अडविल्या. त्या बसच्या चाकातील हवा सोडून बसगाड्यांवर मजय महाराष्ट्रफ लिहून कन्नडीकांनी केलेल्या तोडफोडीचा निषेध नोंदविला. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कार्यकर्त्यांना अडवून बस सोडून दिली. या आंदोलनात स्वराज्य संघटनेचे डॉ. धनंजय जाधव, गणेश सोनवणे, विनोद परांडे, अमोल वीर, निखिल काची, द्वारकेश जाधव, किरण राजपूत, विक्रम कदम, सुमीत दरंदले, दादाराव बोबडे, आकाश लांडगे व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button