रौप्यपदक विजेत्या भाविनाबेन पटेल ला मिळणार आलीशान एमजी एस्टर

रौप्यपदक विजेत्या भाविनाबेन पटेल ला मिळणार आलीशान एमजी एस्टर
Published on
Updated on

भाविनाबेन पटेल हिने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिस क्लास ४ प्रकारात रौप्य पदक जिंकून इतिहास रचला. पॅरालिम्पिकमध्ये टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पहिली खेळाडू ठरली आहे. स्त्रीयांची ताकद आणि दृढनिश्चयाची दखल घेत एमजी मोटर इंडियाने भाविना पटेलच्या ऐतिहासिक कामगिरीला सलाम केला आहे. एमजी मोटर इंडिया स्पेशली कस्टमाइज्ड एमजी एस्टर एसयूव्ही भेट देऊन चमकदार कामगिरीबद्दल भाविनाचा सन्मान करणार आहे.

भाविनाबेन पटेल च्या या मोठ्या विजयाबद्दल अभिनंदन करताना एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा यांनी ट्विट केले की, "विजयी पताका घेऊन परतणाऱ्या भाविनाबेनला एमजी कार भेट देणे हा आमचा सन्मान आणि बहुमान असेल."

भारतात प्रवेश केल्यापासून आणि हलोल येथे आपलं उत्पादन सुरू केल्यापासून एमजी मोटर वडोदरा मॅरेथॉनचे प्रायोजक आहे. वडोदरा मॅरेथॉन इतर मॅरेथॉनपेक्षा वेगळी आहे कारण ती नेहमीच विविध सामाजिक उपक्रमात प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित केली जाते, ज्यात 'दिव्यांग रन' नावाच्या शर्यतीचा सहभाग आहे.

एमजी मोटरने पॅरालिम्पिक ॲथलीट आणि खेलरत्न पुरस्कार प्राप्त डॉ. दीपा मलिक यांच्या आवाजाने आपल्या वैयक्तिक एआय सहाय्यकाला देण्याची घोषणा केली आहे. हा प्रयत्न एमजी ब्रँडचे उत्साही आणि आगामी एसयूव्ही अॅस्टरच्या संभाव्य मालकांना अनोखा अनुभव देईल.

हेही वाचले का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news