कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण : शरद पवार साक्ष नोंदवण्यासाठी आयोगासमोर दाखल

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण : शरद पवार साक्ष नोंदवण्यासाठी आयोगासमोर दाखल

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साक्ष नोंदवण्यासाठी दाखल झाले आहेत. सह्याद्री अतिथीगृहात  न्यायमूर्ती पटेल आयोगासमोर पवार साक्ष नोंदवणार आहेत. ॲड. आशिष सातपुते पवारांना प्रश्न विचारणार आहेत. साक्ष नोंदवण्यासाठी पवारांना समन्स पाठवण्यात आले होते. त्यानुसार, ते आज साक्ष देण्यासाठी हजर झाले आहेत.

न्या. जे. एन. पटेल आयोगाकडून ५ आणि ६ मे रोजी मुंबईत सुनावणी होणार आहे. पवारांनी साक्ष देण्यासाठी मुंबईत हजर राहावे लागणार आहे. याप्रकरणी त्यांना तिसरं समन्स देण्यात आलं होतं. त्यानुसार, आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पवार हे आयोगासमोर साक्ष नोंदवण्यासाठी उपस्थित राहिले. दरम्यान, चौॆकशीसाठी मिलिंद एकबोटे यांची उपस्थिती असल्याचे समजतेय.

काय घडलं होतं?

१ जानेवारी, २०१८ रोजी पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार झाला होता. या हिंसाचारानंतर दंगल उसळली होती. यानंतर हिंसाचार प्रकरणी चौकशीसाठी राज्य सरकारने एक चौकशी आयोग नेमला होता. दरम्यान, याप्रकरणी शरद पवार यांनी हा हिंसाचार शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे भडकल्याचं वक्तव्य केलं होतं. यावेळी आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्याचवेळी अॅड. प्रदीप गावडे यांनी या प्रकरणी पवारांची साक्ष नोंदवण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यामुळे आयोगाकडून शरद पवार यांना साक्ष नोंदवण्यासाठी समन्स पाठवण्यात आले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news