हजारांच्यावर रहस्य कथा, कादंबऱ्या लिहिणारे व प्रचंड असा चाहता वर्ग असणारे प्रख्यात साहित्यिक गुरुनाथ नाईक यांचे आज निधन झाले. पुणे येथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
'अजिंक्य योद्धा', 'अंधा कानून', 'अंधाराचा बळी', 'अफलातून', 'आसुरी', 'कैदी नं. १००', 'गरुडभरारी', 'गोलंदाज', 'झुंज एक वार्याशी', 'मृत्यूकडे नेणारे चुंबन', 'रणकंदन', 'सुरक्षा', 'हिरवे डोळे' ही त्यांच्या काही गाजलेल्या पुस्तकांची नवे आहेत. उदयसिंह राठोड, कॅप्टन दीप, सुरज, मेजर अविनाश भोसले, रजनी काटकर, बहिर्जी नाईक, जीवन सावरकर ही त्यांची पात्रे आजही वाचकांच्या लक्षात आहेत.
मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात नोकरीनिमित्त राहिलेले नाईक मूळचे गोव्याचे होत. गोमंतकातील सत्तरीजवळचे आडवाई साखळी हे त्यांचे मूळ गाव आणि राणे हे त्यांचे मूळ आडनाव होय. मनोहर माळगावकर यांच्याशी बालपणी झालेल्या चर्चेतूनच गुरुनाथ नाईक यांच्या मनात लिखाणाचे बीज रुजले. नाईक यांच्या घराण्याला स्वातंत्र्यलढ्याचीही पार्श्वभूमी आहे.
हेही वाचा :