पाच राज्यांतील कोविड, कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीचा निवडणूक आयोगाने घेतला आढावा

Election Commission
Election Commission

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (गुरुवार) संबंधित राज्यांतील कोविड तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेतला. सदर राज्यातील प्रशासनांनी लसीकरण मोहिमेला वेग द्यावा, असे निर्देशही यावेळी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब तसेच मणिपूर या राज्यांमध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये निवडणुका होणार आहेत. गेल्या काही काळात कोरोनाचे संकट वाढल्याने निवडणुका लांबणीवर टाळण्याची मागणीही होत आहे. तथापी निवडणुका टाळण्याचे संकेत अद्यापपर्यंत आयोगाने दिलेले नाहीत.

या पार्श्वभूमीवर आयोगाने आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांना पाचारण करीत संबंधित राज्यांतील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी यावेळी सादरीकरण केल्याचे समजते. एम्स रुग्णालयाचे संचालक रणदीप गुलेरिया, आयसीएमआरचे बलराम भार्गव हेही याप्रसंगी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news